महाराष्ट्र

Parinay Fuke : आमदारांच्या छत्रछायेत विरोधी नेत्यांची भाजपात नवी साथ

BJP : फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मिळाली क्षितिजांची दिशा

Post View : 35

Author

भाजपने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते पक्षात सामील करून संघटना अधिक मजबूत केली आहे.

राजकारणात सलग तीन टर्मसाठी सरकार चालवणारा आणि जनतेचा विश्वास कायम राखणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष (भाजप). 11 वर्षांच्या कर्तृत्वाचा आढावा देताना भाजपने स्पष्ट केलं आहे की, या पक्षाचे नेतृत्व, रणनीती आणि कार्यशैली देशात मोठे परिवर्तन घडवणारी ठरली आहे. सलग तीन वेळा सत्तेवर टिकून राहणं हे इतिहासात एक अद्वितीय गोष्ट आहे. जी भाजपच्या शक्तीचा प्रत्यय देते. राजकारणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे दूरदृष्टीची नेतृत्वक्षमता. संघटनाला या दूरदृष्टीचा लाभ झाल्यावरच पक्षाला नवसंजीवनी मिळते, तो नवे वळण घेतो आणि विजयाच्या दिशेने ठाम पाऊले टाकतो.

भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे नेतृत्वाची अशीच दखल घेतलेली व्यक्तिरेखा आहेत. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, त्यांना सन्मानाने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न आणि पक्षाला नव्या जोमाने उभे करणं, यामुळे त्यांचा ठसा भंडारा-गोंदिया भागात कायम राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) मधील अनेक अनुभवी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात सामील होऊन पक्षाच्या ताकदीत मोठी भर घालत आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस या पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी सध्या भाजपाच्या वाटचालीत सामील होत आहे.

Amol Mitkari : अकोल्याच्या वीज प्रश्नाकडे दादांच्या ढालीचे दुर्लक्ष

भविष्याचा बळकट वाटा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेली विविध विकासकामे आणि जनतेचा मोठा पाठिंबा भाजपाकडे आकर्षित होत आहे. या राजकीय बदलांमुळे भाजप अधिक मजबूत आणि व्यापक होत चालला आहे. अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते मिलिंदजी रामटेके यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या यादीत किशोरजी चौधरी, वामनजी धोटे (काँग्रेस), शुभम किरणापुरे, विवेक मोटघरे, मोतीलाल रामटेके, योगिता देशभ्रतार (काँग्रेस), आणि प्रशांत रामटेके यांसह इतरही महत्त्वाचे नेते आहे. डॉ. फुके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

Harshwardhan Sapkal : पूल वाहून जाते, सरकार जबाबदारी टाळते 

पक्षाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हे फक्त नवीन सदस्यांचे स्वागतच नव्हे, तर भाजपच्या संघटनेत नवा उत्साह आणि ऊर्जा आणणारे बदल आहेत असे डॉ. परिणय फुके म्हणाले. काही दिवसांपूर्वीही डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाच्या विस्ताराला चालना दिली होती. अशा प्रकारे भाजप हा केवळ विकासाचा पक्ष नसून, सामाजिक एकात्मतेचा आणि राजकीय स्थैर्याचा प्रतीक बनत आहे. भविष्यात या बदलांमुळे भाजप आणखी बळकट होईल, असेही डॉ. फुके यावेळी म्हणाले.

Amravati: वीज नाही म्हणून महावितरण कार्यालयातच लावली आग

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!