महाराष्ट्र

Parinay Fuke : घंटा वाजली शिक्षण विभागाची, कारण आमदार बोलले पूर्व विदर्भासाठी

Monsoon Session : गुणवत्तेची गाथा पण अनुदानाचा शाप

Author

भंडारा जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद शाळांसाठी अकरावी-बारावीच्या विज्ञान शाखेला अनुदान, शिक्षकांच्या वेतनाचा मुद्दा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मांडला.

महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरू होऊन 18 जुलै 2025 रोजी समाप्त झाले. या तीन आठवड्यांच्या कालावधीत अनेक राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर गदारोळ पाहायला मिळाला. मात्र, या गदारोळातही काही नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकहिताचे मुद्दे सातत्याने उपस्थित करत आपली भूमिका ठामपणे मांडली. यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं गेलं ते म्हणजे भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचं. अधिवेशनाच्या प्रत्येक आठवड्यात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे डॉ. परिणय फुके यांनी शेवटच्या दिवशीही आपली परंपरा कायम राखली.

पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये शालेय शिक्षण संदर्भातील एक अत्यंत गंभीर आणि गरजेचा प्रश्न त्यांनी सभागृहात मांडला. तो म्हणजे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांची स्थिती.डॉ. परिणय फुके यांनी सभागृहात उभं राहत प्रश्न क्रमांक 4 अंतर्गत भंडाऱ्यातील शिक्षण सुविधांचा अभाव अधोरेखित केला. ते म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 32 माध्यमिक शाळा कार्यरत आहे. त्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत. उलट त्यांचं शिक्षण दर्जा CBSE शाळांना सुद्धा लाजवणारा आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आमदारांपासून जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत शिफारसी कराव्या लागतात.

अनुदान तुकडी समस्या

जकातदार माध्यमिक विद्यालय, लालबहादूर शास्त्री विद्यालय, जिल्हा परिषद गांधी विद्यालय, साकोली हायस्कूल ही काही शाळा तर गुणवत्तेच्या बाबतीत खूप पुढे आहेत, असं त्यांनी स्पष्ट करत सांगितले. त्यांनी विचारले की, भंडारा जिल्ह्यातील 32 जिल्हा परिषद शाळांमधील अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेला शासनाकडून अनुदान मंजूर केले जाईल का? तसेच, विद्यमान स्वयंसेवक शिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून समाविष्ट करून त्यांना वेतन आणि सेवा सुविधा दिल्या जातील का? याशिवाय, विज्ञान शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा साहित्य खरेदीसाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर केला जाईल का?या प्रश्नांना उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काही महत्त्वाची माहिती दिली.

Parinay Fuke : सत्तेच्या मूक वाऱ्यातून उठली आरोग्यहक्कांची वीज

भोयर यांनी सांगितले की, अकरावीच्या विज्ञान शाखेची अतिरिक्त तुकडी ही विनाअनुदान तत्वावर सुरू करण्यात आली आहे. मात्र, शिक्षकांचा पगार विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या शिक्षण शुल्कावर अवलंबून आहे. काही विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे शिक्षकांचा पगार रखडला आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आलं नाही. परंतु 23 एप्रिल रोजी या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात आली आणि त्यांना संधी दिली गेली, असंही डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले. या चर्चेवरून स्पष्ट होतं की, भंडारा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात गुणात्मक बदल घडत असूनही त्या शाळांना शासनाकडून आवश्यक ते पाठबळ मिळत नाही.

गुणवत्तेचा झेंडा फडकवणाऱ्या शाळांना आर्थिक मदती पासून, शिक्षकांच्या सेवाशर्तींपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय अपेक्षित आहे. डॉ. परिणय फुके यांचा हा मुद्दा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. तर तो संपूर्ण राज्यातल्या गुणवत्तापूर्ण पण दुर्लक्षित शाळांसाठी आवाज बनला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!