महाराष्ट्र

Parinay Fuke : महाज्योतीच्या हितासाठी सरसावले आमदार

Maharashtra : ओबीसी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिणय फुके प्रयत्नशील

Author

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती प्रशिक्षण संस्थेला 10 हजार कोटी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमातीचा मुद्दा नेहमेच चर्चेत राहिला आहे. विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक योजना अडथळ्यात सापडल्या आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 हजार कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीसाठी मागणी केली आहे.

महाज्योती ही केवळ एक संस्था नाही, तर ती ओबीसी व अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. मात्र, शासनाकडून योग्य निधी मिळत नसल्याने UPSC, MPSC, NEET, JEE परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण, परदेशी शिक्षणासाठी मदत आणि कौशल्य विकास योजना या सर्व योजना धोक्यात आल्या आहेत, ही गंभीर बाब लक्षात घेताच डॉ. परिणय फुके यांनी ठोस पाऊल उचलत फडणवीसांकडे मागणी केली.

Parinay Fuke : धरणीचे हसू परत येणार

दुय्यम वागणूक

राज्यात अनुसूचित जाती, जमाती आणि मराठा समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे याला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी 2024-25 साठी 300 कोटी आणि 2025-26 साठीही 300 कोटींचा निधी देण्यात आला. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे याला अनुक्रमे 737.746 कोटींचा निधी मंजूर झाला. तसेच, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेला 2024-25 आणि 2025-26 साठी प्रत्येकी 300 कोटी व इमारतीच्या बांधकामासाठी 2 हजार 300 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मात्र, 55-58 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी कार्यरत महाज्योतीला केवळ 300 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातीलही प्रत्यक्षात केवळ 207 हजार 90 कोटी वितरित झाल्याने संस्थेच्या योजना संकटात आल्या आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाचे स्वरूपही दिसून येत आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेची स्थापना झाली, मात्र निधीअभावी संस्थेची स्वप्ने धुळीस मिळत आहेत, असे डॉ. फुके यांनी नमूद केले.

Parinay Fuke : विधान परिषदेत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा गाजला

भारतरत्नाची मागणी

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली जात आहे. मात्र, त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थेला पुरेसा निधी मिळत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे परिणय फुके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. महाज्योतीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळतो. मात्र, निधी कमी असल्याने या योजनांवर गदा येत असल्याचं डॉ. परिणय फुके यांनी नमूद केलं.

Parinay Fuke : महामार्गासाठी गुजरातसारखा मॉडेल महाराष्ट्रात लागू होणार?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!