महाराष्ट्र

पक्षनिष्ठतेसाठी Parinay Fuke म्हणाले पटोलेंना ना.. ना..

भंडारा Zilla Parishad मध्ये पाळला महायुतीचा धर्म

Share:

Author

महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना नकार दिला. त्यामुळं काँग्रेसचं भाजपला फोडण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.

भारतीय जनता पार्टीप्रती असलेली एकनिष्ठता कायम ठेवण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची ऑफर धुडकावली. अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेत निवडणुकीचा गुलाल उधळला गेला.

या निवडणुकीसाठी पटोले यांनी फुके यांना खास ऑफर दिली होती. या ऑफरनुसार जिल्हा परिषदेत भाजप आणि काँगेसनं एकत्र यावं असे पटोले यांना वाटत होतं. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद कसं वाटून घ्यायचं हे पटोले यांनी फुके यांना सांगितलं होतं. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि भाजपप्रती असलेल्या एकनिष्ठतेमुळं फुके यांनी पटोले यांना ‘ना.. ना..’ म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले हटाव मोहिम सुरू झाली आहे. प्रचंड राजकीय संघर्ष सुरू असताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या गृहजिल्हा भंडाऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

लवकरच बदलणार Washim जिल्ह्याचा पालकमंत्री

मात्र भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या चुकीमुळं हाती आलेलं अध्यक्षपद काँग्रेसच्या पदरात पडलं. कार्यकारिणी आणि गटनेत्यानं सगळ्यांना विश्वासात घेतलं असतं तर आजच्या घडीला जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी झाली असती. त्यामुळं एकीकडे काँग्रेसच भाजपसोबत येण्यासाठी आसुसली होती, पण भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीनीनच ‘हात’ दाखवून अवलक्ष केल्याचं आता बोललं जात आहे.

उपाध्यक्ष पदासाठी प्रयत्न

काँग्रेसच्या कविता उईके या गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या संपर्कात होत्या. त्यांचा पक्ष प्रवेश झाला असता तर जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा झाला असता. परंतु गटनेत्यानं ही बाब कोणाला कानोकान कळू दिली नाही. त्यामुळं भाजपनं उईके यांच्या संपर्काला काहीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी प्रतिसाद मिळत नसल्यानं उईके या काँग्रेसमध्येच कायम राहिल्या. त्यांची बिनविरोध निवड झाली.

एकूणच ही परिस्थिती पाहता डॉ. परिणय फुके यांच्या पक्षवाढीच्या प्रयत्नांना भाजपमधूनच सुरूंग लावण्याचं काम झालं. मात्र त्यानंतरही फुके यांनी आशा सोडली नाही. आपली राजकीय खेळी खेळत त्यांनी भंडारा जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष करून दाखविण्याचा चंग बांधला आहे. यातून त्यांनी महायुतीचा धर्म पाळत असल्याचं दाखवून दिलं.

भाजपच्या दुर्लक्षाने Bhandara ZP काँग्रेसच्या ताब्यात

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला प्रत्येक पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. अशात प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात तर भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला असता तर त्याला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं असतं. परंतु भाजप कार्यकारिणीमधील नेत्यांना या तडजोडीचं महत्व कळलं नाही. केवळ स्वार्थापोटी त्यांनी कविता उईके यांचा पक्ष प्रवेश रोखला.

त्यामुळं भंडाऱ्यात काँग्रेसची अर्थात नाना पटोले यांची ‘कॉलर टाइट’ राहिली. कविता उईके या भाजपमध्ये आल्या असत्या तर त्याच अध्यक्ष झाल्या असत्या. त्यामुळं भाजपला अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला असता. इतकंच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला धुळ चारल्याचं ‘क्रेडिट’ही भाजपला मिळालं असतं. पण भाजपची जिल्हा कार्यकारिणीच हे समजू शकली नाही तर त्याला कोण काय करणार‌, असा प्रश्न आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!