महाराष्ट्र

Bhandara NCP : पटेलांच्या नोंदणी अभियानातून फुकेंनी केले दोघं हायजॅक

Praful Patel : राष्ट्रवादीतील सदस्य भाजपच्या तंबूत

Post View : 22

Author

भंडारा जिल्ह्याच्याय राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोघांना भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी हायजॅक केले आहे.

माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या सदस्य नोंदणीचे विमान टेकऑफ करण्याच्या तयारीत असतानाच दोन जण हायजॅक झालेत. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी हे हायजॅक यशस्वी करून दाखवले. त्याचे झाले असे की, प्रफुल पटेल यांनी अलीकडेच भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान राबवले. या अभियानामध्ये भंडारा जिल्ह्यातून अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाव नोंदणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या वाढण्याच्या तयारीत असतानाच आमदार डॉ. परिणय फुके यांनी कमाल दाखवली. एखादे विमान आकाशात कितीही उंच उडत असले तरी जमिनीवर असलेल्या ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’च्या हातात या विमानाची सगळी सूत्र असतात. जोपर्यंत ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ मधून आदेश येत नाही तोपर्यंत, कुशल पायलट देखील विमान लँड करू शकत नाही किंवा टेकऑफ करू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने आमदार डॉ. परिणय फुके यांनी बसल्या ठिकाणाहून राष्ट्रवादीच्या विमानातून दोघांना गायब करून दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक राजू गायधने आणि ललित शुक्ला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे दोघे भाईजींकडे जाणार होते.

Gadchiroli Police : आत्मसमर्पित माओवादींसाठी विपश्यना शिबीर

भाईजी लक्ष ठेवा

भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये भाईजी अर्थात प्रफुल पटेल यांचे मोठे प्रस्थ आहे. पटेल हे केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे त्यांचा दबदबा भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कायम आहे. आता तर भाईजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल पटेल यांचे विमानतळावर एकांतात संवाद साधतानाचे फोटोही मध्यंतरी व्हायरल झाले होते. असे असले तरी आमदार डॉ. परिणय फुके हे देखील काही कमी नसल्याचे आता सिद्ध होत आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात डॉ. परिणय फुके यांचे राजकीय वजन देखील जास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय असलेले फुके यापूर्वी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. ओबीसी (OBC) समाजाचे आंदोलन असो की काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, यातून डॉ. फुके यांनी आपले राजकीय वजन दाखवून दिले आहे. अलीकडेच त्यांच्या पत्रामुळे महसूल विभागातील दोन अधिकारी देखील निलंबित झालेत.

Nagpur : बोगस शिक्षक प्रकरणात आणखी तिघांना अटक

यापूर्वी याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी देखील पत्र दिले होते. मात्र या मुद्द्याची दखल त्यावेळी घेतली गेली, ज्यावेळी डॉ. परिणय फुके यांनी आपले पत्र दिले. अशातच राष्ट्रवादीच्या खेम्यातून दोघांना गायब केल्यामुळे भाईजींच्या तोडीपेक्षाही तोड म्हणून डॉ. परिणय फुके यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. त्यामुळे भाईजींचे दुर्लक्ष झाले की फुके यांच्या राजकीय शक्तीत वाढ झाली? अशी चर्चा आता पूर्व विदर्भात रंगली आहे.

Umred Blast : एमएमपी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांवर पोलिसांचा खटला

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!