
भंडारा-गोंदिया जिल्ह्याला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. संकटसमयी तत्परतेने धावून येणाऱ्या या संवेदनशील नेत्यानं पुन्हा एकदा आपली लोकनेते म्हणून ओळख अधोरेखित केली आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात आपली एक विशेष ओळख निर्माण करणारे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत. जनतेच्या समस्या आणि त्यांच्या अडचणींवर तात्काळ लक्ष देणारे कार्यक्षम आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. भाजपची भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पकड भक्कम राहावी यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक करून परिश्रम घेतले आहेत. पक्षासाठीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे, खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत डॉ. परिणय फुके.
नुकतीच बबई येथील विषबाधेची दुर्दैवी घटना ही देखील डॉ. फुके यांच्या जनतेप्रती असलेल्या तितक्याच संवेदनशीलतेचे उदाहरण आहे. गोरेगाव तालुक्यातील बबई येथे एका लग्नसमारंभात दिल्या गेलेल्या जेवणातून काही नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. परिणय फुके यांनी तात्काळ गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. सर्व रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

संवेदनशील नेतृत्व
रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधत त्यांनी सर्व रुग्णांवर तातडीने व योग्य उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. गरज असल्यास मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी देखील ठेवावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. फक्त भेट घेऊन थांबले नाहीत, तर रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत, शक्य तेवढ्या सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासनही डॉ. परिणय फुके यांनी दिलं.
आमदार डॉ. परिणय फुके यांनी यापूर्वीदेखील नागरिकांसोबत ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचा पाठपुरावा देखील केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या नेहमीच गांभीर्याने घेतल्या आहेत. अधिवेशनाच्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठामपणे आवाज उठवला. पीकविमा, कर्जमाफी, अनुदान आणि नुकसानभरपाई यांसारख्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी करत, डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभं राहत आपली बांधिलकी दाखवून दिली.
गोरगरीबांच्या समस्या सोडवण्यासाठी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार यांसारख्या क्षेत्रात डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने काम केलं आहे. त्यांचे नेतृत्व म्हणजे जनतेच्या विश्वासाचा आधार आहे. त्यांच्या कामामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील भाजपा संघटना अधिक बळकट झाली आहे. सतत लोकांच्या संपर्कात राहून, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन आणि त्यावर मार्ग काढणारे नेतृत्व म्हणजेच भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.