देश

Parinay Fuke : जनगणनेतून होणार सबका साथ, सबका विकास

Caste Wise Census : मोदी सरकारचा निर्णय सामाजिक उत्कर्षाचे पर्व

Author

मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाच्या दिशेने नवे पर्व सुरू झाले आहे. या निर्णयाचे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जल्लोषात स्वागत करत, याला सर्वसमावेशक विकासाचा मजबूत पाया, असे संबोधले आहे.

सामाजिक न्यायाच्या दिशेने एक निर्णायक आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मनःपूर्वक स्वागत करत, याला सामाजिक उत्कर्षाचे पर्व ठरवले आहे.

जातनिहाय जनगणना ही सामाजिक लोकशाही मजबूत करण्याची दिशा आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या मागणीला न्याय मिळाला आहे, असे फुके यांनी ठामपणे सांगितले. फुके म्हणाले, जातिनिहाय जनगणनेतून मिळणाऱ्या अचूक आकडेवारीच्या आधारे कल्याणकारी योजना योग्य ठिकाणी पोहोचू शकतील. समाजातील मागास आणि उपेक्षित घटकांचा विकास अधिक प्रभावीपणे करता येईल. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे जे सर्वसमावेशक समाजनिर्मितीस गती देईल.

Devendra Fadnavis : आरोग्याला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सज्ज  

खरी लोकसंख्या येणार समोर

मोदी सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे अनेक जातींना प्रथमच अधिकृत लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व आणि विकासाचे दरवाजे खुले होतील, असे सांगताना डॉ. परिणय फुके यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, आजवर जी अनेक जाती – जमाती सामाजिक-राजकीय गणनेपासून दूर होत्या, त्यांची खरी लोकसंख्या प्रथमच समोर येणार आहे. त्यामुळे त्या समाजघटकांच्या हक्कांची मांडणी आणि त्यांच्या अडचणींना अधिक अधिकाराने सरकार दरबारी नेण्याचा मार्ग मोकळा होईल.

डॉ. परिणय फुके यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले की, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या सामाजिक बांधिलकीचा मजबूत पुरावा आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेला खरी धार आता मिळणार आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केवळ आकडेवारी मिळणार नाही, तर त्याआधारे धोरण आखणी, निधी वितरण आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या बाबतीत देश एक नवा अध्याय लिहिणार आहे, असा विश्वास फुके यांनी व्यक्त केला.

Vijay Wadettiwar : जातनिहाय जनगणना मंजूर होताच विरोधकांनी उचलला सूर

केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयासाठी भाजपच्या नेतृत्वाचे जोरदार अभिनंदन करत, परिणय फुके यांनी संपूर्ण देशात समतेच्या आणि विकासाच्या नव्या युगाच्या प्रारंभाची घोषणा केली. ही केवळ जनगणना नाही, तर सामाजिक न्यायाचा महोत्सव आहे, असेही परिणय फुके म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!