महाराष्ट्र

भंडाऱ्याचा पालकमंत्री ठरताना Parinay Fuke निभावणार भूमिका

मंत्री नसले तरी निभावत आहे चोखपणे आपली Responsibility

Post View : 24

Author

Views: 22598

राज्यात लवकरच पालकमंत्री पदाच्या जबाबदारीचं वाटप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच यासंदर्भातील घोषणा करू शकतात.

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लवकरच पाकलमंत्री पदाच्या जबादारीचं निश्चितीकरण केलं जाणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी जिल्ह्यांना पालकमंत्री मिळतील असं सांगण्यात येत आहे. पाकलमंत्री मिळण्यापूर्वी महायुतीमधील अनेक मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. एखादा जिल्हा आपल्याला मिळावा यासाठी अनेक मंत्री लॉबिंग करीत आहे. अशात विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेल्या भंडाऱ्याचा पालकमंत्री कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार डॉ. परिणय फुके यांचं प्राबल्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांमध्ये डॉ. फुके यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळं भंडाऱ्याचा पालकमंत्री निश्चित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. फुके यांचं मत विचारात घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आजापर्यंत डॉ. परिणय फुके यांनी एखादा शब्द फडणवीस यांच्याकडं टाकला आणि तो पूर्ण झाला नाही, असं झालेलं नाही. गेल्या महायुती सरकारच्या काळात ओबीसी समाजानं नागपुरात आंदोलन सुरू केलं होतं. त्यावेळी डॉ. परिणय फुके यांनी या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी केली होती. मंत्री अतुल सावे यांच्यासोबत त्यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक घडवून आणली होती. त्यानंतर ओबीसी समाजाचा राग शांत झाला. ओबीसींचे अनेक प्रश्न मार्गी लागले. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याचं कसब डॉ. फुके यांनी पूर्ण केलं. त्यामुळे महायुतीला यश मिळालं. त्यामुळं डॉ. फुके यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं.

सावनेरचे आमदार Ashish Deshmukh यांनी पकडले वाळू, सुपारी तस्कर

Suggestion विचारात घेणार

भंडारा जिल्ह्यात भाजपची पाळमुळं घट्ट करण्यात आमदार डॉ. परिणय फुके यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. ते यापूर्वी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळं भाजपला या जिल्ह्यात आपलं वर्चस्व कायम ठेवावं लागणार आहे. परिणामी भंडाऱ्याला पालकमंत्री नियुक्त करताना डॉ. फुके यांना मुख्यमंत्र्यांकडून विचारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांची कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार डॉ. परिणय फुके यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीनं भंडाऱ्याचा पालकमंत्री नेमताना महायुती सरकार बरीच काळजी घेणार आहे.

राज्यात कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा डॉ. परिणय फुके यांचं नाव असेल असं वाटत होतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी फुके यांना वेगळी जबाबदारी दिली. पद असलं काय किंवा नसलं काय, काम करीत राहणाऱ्या नेत्यांपैकी फुके एक आहेत. त्यामुळं त्यांनी सरकार येताच भंडारा जिल्ह्यात व्यापकपणे कामाला सुरुवात केली आहे. मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही नाराजीचा भाव नाही. पालकमंत्री अमुकच व्यक्ती मिळावा, यासाठी देखील ते हट्ट करताना दिसत नाही. यासाठी त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दाही केलेला नाही. ते लेाकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्यांच्या या एकनिष्ठतेचे फळ म्हणूनच कदाचित भंडाऱ्याचा पालकमंत्री नियुक्त करताना त्यांना एक शब्द नक्कीच विचारलं जाईल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!