महाराष्ट्र

Parinay Fuke : भगिरथ प्रयत्न अन् गरजूंच्या डोक्यावर छत

PM Narendra Modi : माजी मंत्र्याच्या पुढाकारानं आवास योजनेचा लाभ

Share:

Author

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. स्वप्नातील घरकूल बांधण्यासाठी माणसाचं पूर्ण आयुष्य खर्ची पडतं. अशात आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर घर होईल की नाही, याची खात्री नसते. अशा अनेक कुटुंबांसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सरसावले.

देशभरातील गरीबांना घरकूल मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ झाला. भंडारा जिल्ह्यातील गोरगरिबांनाही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भगिरथ प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून भंडारा जिल्ह्यातील अनेकांचे घराचं स्वप्न साकार होणार आहे. ग्रामीण भागातील 20 लाख लोकांसाठी घरकूल मंजूर झालं आहे. दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हफ्तयाच्या रकमेचं वितरणही केलं जाणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील पोलिस बहुउद्देशीय सभागृहात यानिमित्त खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थी प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यावेळी उपस्थित होते. भंडारा भाजपच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ, सबका विकास हा मंत्र दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं गरीबांच्या कल्याणार्थ अनेक योजना राबविल्या. त्यातून कोट्यवधी जनतेला बीपीएलच्या चक्रव्यूहातून सुटता आलं. त्यामुळं गरीबांच्या कल्याणाचं काम मोदी है तो मुमकीन है, असंच असल्याचं डॉ. फुके म्हणाले.

Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही

झपाट्यानं विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत करीत आहे. आगामी काळात महाराष्ट्र आशिया खंडातील सगळ्यात प्रगत राज्य असेल. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र आणि खरोखर गरज असलेल्या व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा, असा प्रयत्न असल्याचे डॉ. फुके यावेळी म्हणाले.

कोणत्याही व्यक्तीला आपलं घर व्हावं हे वाटणं स्वाभाविक आहे. घरकूल उभारण्यासाठी व्यक्ती आयुष्यभर खस्ता खात राहतो. डोक्यावर प्रचंड मोठं कर्जही होतं. सामान्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. पंतप्रधानांनी घेतलेल्या या पुढाकारात आपलंही योगदान असावं असं आपल्याला वाटत होतं. त्यामुळं पात्र लाभार्थ्यांसाठी आपणही काही तरी करावं असं वाटत होतं. यासाठी आपण प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्याला साथ मिळावी. आता भंडाऱ्यातील अनेकांचं घराचं स्वप्न त्यामुळं साकार होणार असल्याचं डॉ. परिणय फुके यावेळी म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!