महाराष्ट्र

Devendra Fadnavis : तीन दिवस, दोन जिल्हे, एकच ध्येय निवडणूक जिंकणे

Local Body Election : मोदींचा कानमंत्र; भाजप बनणार महायुतीचा ‘मोठा भाऊ’

Post View : 38

Author

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगत अधिक तीव्र झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नवी मुंबई दौऱ्यावर असताना भाजपच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे चित्र उभे राहिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, रणनीतींचा कस लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीने राजकीय वातावरणाला नवा रंग चढला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना निवडणुकीसाठी ‘गुरुमंत्र’ दिल्याची जोरदार चर्चा आहे. हा मंत्र भाजपला महायुतीत ‘मोठा भाऊ’ म्हणून उदयास आणण्यासाठी मोलाचा ठरणार, यात शंका नाही. मोदींच्या मुंबई दौऱ्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पण त्यापेक्षा लक्षवेधी ठरली ती राजभवनातील भाजपच्या दिग्गज नेत्यांची गुप्त बैठक.

बैठकीत पंतप्रधानांनी स्थानिक निवडणुकीसाठी रणनीती ठरवली आणि नेत्यांना विजयाचा मूलमंत्र दिला. या बैठकीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, भाजप आता पूर्ण ताकदीने निवडणूक रणांगणात उतरणार आहे. पंतप्रधानांच्या कानमंत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कंबर कसली आहे. उद्यापासून ( 9 ऑक्टोबर ) ते तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही असणार आहेत. हा दौरा म्हणजे निवडणुकीच्या तयारीचा ‘मेगा रोडमॅप’ आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, फडणवीस प्रत्येक जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तयारीचा बारकाईने आढावा घेणार आहेत.

Randhir Sawarkar : राज राजेश्वर मंदिरासाठी कोट्यवधींचा प्रस्ताव मंजूर

महाविकास आघाडीची चिंता

बैठकींना स्थानिक नेते, आमदार, खासदार, पालकमंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, केवळ निवडक नेत्यांनाच प्रवेश मिळणार आहे. ही गोपनीयता आणि रणनीती यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांचा हा दौरा म्हणजे केवळ आढावा नाही, तर महायुतीच्या विजयाची खरी तयारी आहे. प्रत्येक प्रभागात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्यापासून ते स्थानिक पातळीवरील गटबाजी संपवण्यापर्यंत, फडणवीस सर्व बाजूंनी रणनीती आखत आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ‘मोदींचा मंत्र, फडणवीसांचा रथ’ अशी चर्चा आता भाजपच्या गोटात आहे.

भाजपच्या या आक्रमक तयारीमुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपने आता गाव पातळीपासून रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर महाविकास आघाडी अजूनही अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावात अडकलेली दिसते. भाजपच्या रणनीतीत विरोधकांना धक्का देण्याची ताकद आहे. यामुळे महाविकास आघाडीला आपली रणनीती पुन्हा तपासावी लागणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता एकजुटीने कामाला लागावे लागेल, अन्यथा भाजपच्या या सुनियोजित रणनीतीसमोर त्यांना धोबीपछाड खावी लागेल. स्थानिक निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांच्या मनात स्थान मिळवणं आवश्यक आहे. यात भाजप आघाडीवर आहे.

Akola : आवाज उठवा! निवडणूक आरक्षणाच्या हरकतींसाठी काउंटडाउन सुरू

पंतप्रधानांचा करिष्मा, फडणवीसांचा रणनीतीक डाव आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे भाजपचा विजयी रथ रोखणं विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!