महाराष्ट्र

PM Modi : काटेझरीत ढोल-ताशांचा नाद

Gadchiroli : माओवादविरोधी लढ्याला पंतप्रधानांची सलामी

Post View : 31

Author

पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये काटेझरीतील विकासाचा उल्लेख करत माओवादाविरोधी लढ्याला दाद दिली. बस सेवा ही बदलाची नांदी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात दहशतवादाविरुद्ध देशभर एकजूट होण्याचा ठाम संदेश दिला. आज संपूर्ण देश दहशतावादाविरुद्ध एकवटल आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात दहशतवादाविरोधात संताप आहे, असे त्यांनी नमूद केले.

दहशतवादाचा नायनाट करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयाचा असल्यावर भर देत, त्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्याच्या शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचेही सांगितले. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूर हे दोन महत्वाचे मुद्दे विशेष ठळक केले.

प्रगतीचा नवा संदेश

पंतप्रधानांनी खास गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा उल्लेख करत या माओवादग्रस्त भागात होणाऱ्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. मी तुम्हाला अशा गावाबद्दल सांगू इच्छितो, जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली. त्या दिवशी गावातील लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं, असे त्यांनी सांगितले. मार्च 23, 2025 रोजी या भागात बस सेवा सुरू झाल्याची घटना केवळ वाहतुकीचा नव्हे तर विकासाचा एक मोठा टप्पा आहे, अशी त्यांनी दखल घेतली. काटेझरीसारख्या माओवादग्रस्त भागात बस सेवा सुरू होणे ही एक मोठी प्रगती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Indian Railways : इंजिनाच्या हृदयात उजळले विदर्भाचे नाव 

काटेझरी गावापासून आजूबाजूच्या परिसरात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. माओवादाविरुद्ध लढाईमुळे दुर्गम भागांमध्येही मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत. हा बदल केवळ गावापुरता मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गावकऱ्यांनीही या बस सेवेचा मोठ्या अपेक्षेने स्वीकार केला आहे. या सेवेमुळे त्यांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे असे त्यांनी सांगितले.

संघर्षातून विकासाचा सूर

काटेझरीमध्ये पूर्वी पक्की सडक असूनही बस सेवा न होण्याचे कारण माओग्रस्त हिंसाचार होता. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. या भागात मुख्य प्रवाहात येण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. ही बस सेवा फक्त वाहतुकीची गरज भागवणारी नाही, तर ती विकासाची, सुरक्षिततेची आणि सामान्य जीवनाकडे वाटचाल करणारी आशादायी चिन्हे घेऊन आली आहे.

पंतप्रधानांच्या या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद विरोधी मोहिमेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. तसेच या भागातील नागरिकांना मिळणाऱ्या विकासाच्या फळांबाबत जनतेमध्ये उत्साह निर्माण होण्यास मदत झाली आहे. काटेझरीसारख्या दुर्गम भागातील बदल देशाला दाखवतो की, शौर्यवान सैन्य आणि जनतेच्या एकतेमुळे कोणतेही आव्हान पार करता येऊ शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!