महाराष्ट्र

PM Modi at Nagpur : संघ संस्कृतीपासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत

RSS : नागपूरच्या भूमीवर नव्या भारताची पायाभरणी

Author

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर भेटीने शहराच्या औद्योगिक, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्राला नवा वेग मिळाला. ऐतिहासिक वारशाला सन्मान मिळत विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरला भेट देऊन विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला भेट देत त्यांनी संघाच्या विचारधारेशी आपली नाळ अधिक दृढ केली. दीक्षाभूमीवर नतमस्तक होत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी नागपूरच्या औद्योगिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीस नवा वेग देणाऱ्या प्रकल्पांना प्रारंभ दिला.

नागपूरच्या विकासाला या भेटीमुळे नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांनी स्मृती मंदिर (RSS) येथे जाऊन संघाच्या ऐतिहासिक वारशाचा गौरव केला. यानंतर त्यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचा पायाभरणी समारंभ केला आणि नागपूरच्या आरोग्यसेवांमध्ये नवीन पर्व सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. या केंद्रामुळे नेत्रचिकित्सेच्या क्षेत्रात देशपातळीवर महत्त्वाची भर पडणार आहे.

Narendra Modi : संघाच्या दोन स्तंभांना शतशः नमन

औद्योगिक क्षेत्राला बळकटी

सोलार इंडस्ट्रियल एक्सप्लोसिव्हज येथे पंतप्रधानांनी देशाच्या संरक्षण क्षमतेला वाढवणाऱ्या लोईटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि UAV रनवेचे उद्घाटन केले. हे प्रकल्प भारताच्या संरक्षण स्वावलंबनाला बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत. नागपूर हे औद्योगिकदृष्ट्या भारताच्या नकाशावर वेगाने पुढे येत आहे. या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे.

नागपूर आता केवळ भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर राहिलेले नाही.देशाच्या प्रगतिपथावरील एक महत्त्वाचा विकासकेंद्रबिंदू बनत आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे नागपूरच्या वैद्यकीय, औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला मोठी चालना मिळाली आहे.

सांस्कृतिक वारशाला अभिवादन

दीक्षाभूमीला भेट देत पंतप्रधान मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान केला. नागपूर हे सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. या भेटीमुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाला नवा उजाळा मिळाला आहे. नागपूर हे आता केवळ संतांचे, विचारवंतांचे आणि सामाजिक क्रांतीचे शहर नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग आणि आरोग्यसेवेच्या बाबतीतही भारताचे अग्रगण्य केंद्र बनत आहे.

पंतप्रधान मोदींच्या या भेटीनंतर नागपूरच्या विकासाला आणखी वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्योग, संरक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक वारसा या सर्वच क्षेत्रांमध्ये या दौऱ्यामुळे सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!