देशातील न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला हादरवणाऱ्या घटनेनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आरोप करत या प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
देशाच्या न्यायव्यवस्थेच्या मंदिरात, सुप्रीम कोर्टाच्या पवित्र परिसरात, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाला एक स्फोटक वळण दिले. त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. त्यांनी या हल्ल्यामागील कथित प्रेरक शक्ती म्हणून संघाला लक्ष्य केले आहे. त्यांचे मौनच या कटातील सहभागाचे संकेत देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे देशाच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात एक नवे त्सुनामी निर्माण झाले आहे.
आंबेडकर यांनी या प्रकरणाला केवळ एक घटना न मानता, यामागील खोलवर रुजलेल्या जातीवादी मानसिकतेचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या मते, हा हल्ला एका व्यक्तीविरुद्ध नाही. तर देशातील दलित समाजाच्या प्रगतीविरुद्धचा सुनियोजित डाव आहे. हा प्रकार म्हणजे केवळ बूट फेकण्याचा प्रयत्न नव्हे. तर सामाजिक समतेच्या मूल्यांना आव्हान देणारी एक धोक्याची घंटा आहे. आंबेडकर यांनी आपल्या बाणेदार शैलीत या प्रकरणाला सामाजिक क्रांतीच्या लढ्याशी जोडले. यामागील मनुवादी प्रवृत्तींना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
Vijay Wadettiwar : दोन सप्टेंबरच्या काळ्या जीआरचा घालमेल थांबवा
कटाचा मूक पुरावा
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या तीक्ष्ण शब्दांनी संघाच्या मौनाला कटाचा मूक पुरावा ठरवले आहे. त्यांच्या मते, हल्लेखोर राकेश किशोर याचा संघाच्या शाखांशी असलेला संबंध हा केवळ योगायोग नाही. आरोपीने अनेकदा संघाच्या शाखांना भेटी दिल्याचे पुरावे असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी हा हल्ला एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचे सूचित केले आहे. यामागे दलित नेतृत्वाला लक्ष्य करण्याची सनातनी मानसिकता असल्याचा आरोप केला आहे. संघाचे यावरील मौन हे त्यांच्या सहभागाचे अप्रत्यक्ष संकेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आंबेडकर यांनी या घटनेला एका व्यापक सामाजिक संदर्भात मांडले आहे. एकेकाळी गावांपुरता मर्यादित असलेला जातीवाद आता शहरांमध्ये. कार्यालयांमध्ये, रुग्णालयांमध्ये आणि अगदी सरकारी यंत्रणांमध्येही उघडपणे डोके वर काढत आहे. सरन्यायाधीशांसारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर हल्ला होणे. हे जातीवादी मानसिकतेच्या बेलगाम वृत्तीचे द्योतक आहे. आंबेडकर यांनी हा हल्ला केवळ एक घटना नाही. तर दलित आयएएस अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना आणि इतर उच्चपदस्थांना लक्ष्य करण्याचा संदेश असल्याचे ठामपणे सांगितले. हा प्रकार म्हणजे समतेच्या लढ्याला आव्हान देणारी एक धोक्याची खेळी आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाला सामाजिक क्रांतीच्या लढ्याशी संबोधित केले. दलित समाजाच्या सक्षमीकरणाचा आवाज बुलंद केला आहे. त्यांनी हा हल्ला देशातील सामाजिक समतेच्या लढ्याला नवे आव्हान ठरेल, असे भाकीत वर्तवले आहे. त्यांच्या मते, असे हल्ले दलित समाजाला दडपण्याचा प्रयत्न असला, तरी यामुळे त्यांचा निर्धार अधिक दृढ होईल. आंबेडकर यांचा हा लढा केवळ एका घटनेचा पर्दाफाश करणारा नाही. तर देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा देणारा आहे.
