महाराष्ट्र

Prakash Ambedkar : एका फोनवरून पुण्यातील पोलिसाला हादरवलं

Pune Police : एफआयआर लगेच नोंदवा, नाहीतर सुप्रीम कोर्टात देऊ धडक

Author

कोथरूड पोलिस ठाण्यात तिन्ही दलित तरुणींवर कथित छळ प्रकरणी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी थेट पोलिस अधिकाऱ्याला फोन करत तात्काळ एफआयआर नोंदवण्याचा इशारा दिला.

एक लक्षात घ्या कदम… हे पोलीस कोणत्या कायद्याखाली कोणाच्याही घरात घुसतात? असा थेट जाब विचारत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात तिन्ही दलित महिला कार्यकर्त्यांवर पोलिसी छळ झाल्याच्या गंभीर आरोपांनंतर तब्बल 24 तास उलटले तरी एफआयआर दाखल न झाल्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर आंबेडकरांनी स्वतः एक पोलिस अधिकाऱ्याला फोन करून दोन दिवस नाही, ताबडतोब एफआयआर व्हायला हवा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विवाहित दलित तरुणीला तिच्या पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासातून वाचवण्यासाठी तिला पुण्यात आणण्यात आलं. तिच्या मदतीसाठी पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्या पुढे सरसावल्या. त्यांनी तिला ‘सखी सेंटर’मध्ये सुरक्षित दाखल करून, पुनर्वसन व स्वावलंबनासाठी आवश्यक प्रशिक्षणाचीही सोय केली. परंतु, पीडित तरुणीच्या नात्यातील एक निवृत्त पोलिस अधिकारी असल्याने, त्याच्या दबावाखाली पुणे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा समन्स न देता थेट त्या तीन कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकला आणि त्यांना जबरदस्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात नेले.

Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा

आक्षेपार्ह वागणूक

या प्रकरणात एफआयआर दाखल होईपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सुजात आणि अंजली आंबेडकर, आमदार रोहित पवार आणि अनेक कार्यकर्ते रात्रीपासून थेट पुणे पोलिस आयुक्तालयात ठिय्या देऊन बसले. पहाटे साडेतीनपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, पण अद्याप गुन्हा दाखल झालाच नाही. यामुळे चिडून प्रकाश आंबेडकर यांनी थेट पोलिस अधिकारी कदम यांना फोन लावला. फोनवर त्यांनी खडसावून विचारलं की, “कुठल्या कायद्याने पोलीस कोणाच्याही घरात नोटीस किंवा वॉरंटशिवाय घुसू शकतात? ती मुलगी फक्त 25 वर्षांची आहे. एफआयआर नोंदवा आणि मग तपास करा. हे काय न्याय आहे?

पोलिस अधिकाऱ्याने ‘दोन दिवसात बघतो’ अशी गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्यावर प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले. दोन दिवस नाही, ताबडतोब एफआयआर नोंदवा. नाहीतर आम्ही आंदोलन करतो. धरणं देऊन बसा म्हणतो मी त्यांना. कायदा हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, तक्रार आली की एफआयआर नोंदला गेला पाहिजे. चौकशी नंतर करा. पोलिसांचा विरोध समजत नाही. एफआयआर नोंदवत नसाल, तर आम्ही सुप्रीम कोर्टाला पत्र लिहू, असा इशाराही त्यांनी दिला.

Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी

मानसिक दबाव

या तिन्ही महिलांनी आरोप केला आहे की, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये त्यांना एका वेगळ्या खोलीत नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अत्यंत अपमानास्पद शब्दांत प्रश्न विचारण्यात आले. त्यांचा थेट आरोप आहे की, API प्रेमा पाटील, PSI अमोल कामटे व महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला. सर्व आरोपांनंतर देखील पुणे पोलिसांनी साडेतीन वाजता या महिलांना फक्त चार ओळींचं पत्र दिलं, ज्यामध्ये एफआयआर नोंदवता येणार नाही असं नमूद केलं. कारण म्हणून सांगण्यात आलं की, ही घटना सार्वजनिक स्थळी नाही, तर बंद खोलीत घडली. पुरावे नाहीत. अॅट्रोसिटीच्या तक्रारीत तथ्य नाहीत.

संतापाची लाट

या प्रकारावरुन दलित समुदायात, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. वंचित बहुजन आघाडीने हा मुद्दा अधिक व्यापक पातळीवर नेण्याचा इशारा दिला असून, पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाचा ‘दलितांप्रती’ दृष्टिकोन, कायद्याचा गैरवापर आणि पोलिसांची जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रकाश आंबेडकरांचा रोष हे केवळ राजकीय प्रतिक्रिया नाही, तर कायद्याच्या रक्षणासाठी उठलेली एक गंभीर हाक आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे, पुणे पोलिसांचा पुढचा पाऊल काय असणार?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!