देश

Prakash Ambedkar : मोदींच्या सत्तेत सर्वसमावेशकता कुठे हरवली?

Maharashtra Election 2024 : सायंकाळी सहाचा रहस्यमय खेळ अजूनही गुंतलेला

Post View : 51

Author

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील गढूळ राजकारण आणि पक्षीय नेतृत्वाच्या अभावावर टीका केली. तसेच वंचित समाजासाठी सत्तेचा प्रवास अजून दीर्घकालीन असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे राजकीय रणमैदान सध्या धुळीने माखले आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला धोबीपछाड देत सत्तेची चावी खिशात टाकली. पण हा पराभव काँग्रेसला अजूनही पचनी पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. या गदारोळात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या परखड शैलीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना खड्ड्यात घेतले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवत देशात सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव असल्याचा घणाघात केला. आयोजित केलेल्या एका वार्तालापात आंबेडकरांनी राजकीय नेत्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

देशाला सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. पण सध्याचे नेतृत्व फक्त पक्षीय हित सांभाळत आहे. यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे, असे सांगत त्यांनी मोदींना ‘सनातन हिंदुत्ववादी’ म्हणून टोमणा मारला. राहुल गांधींवरही त्यांनी निशाणा साधला. राहुल गांधी मतचोरीचा गवगवा करतात. पण सायंकाळी सहानंतरच्या मतदानाचा गंभीर मुद्दा त्यांनी उचलायला हवा होता. त्या मतदानाची माहितीच उपलब्ध नाही, हे धक्कादायक आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर बोट ठेवले. सायंकाळी सहानंतरच्या मतदानाचे कोणतेही चित्रीकरण नाही, माहिती नाही. मग ही निवडणूक प्रक्रिया खरंच पूर्ण झाली का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis : गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून ठाकरे भाऊ एकत्र आले

मराठा आरक्षणावर आक्षेप

आंबेडकर यांनी राजकीय नेतृत्वाच्या कमकुवतपणावरही भाष्य केले. मंत्र्यांना काढण्याची धमक आजच्या नेत्यांमध्ये नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक नेता मिळालाच नाही, असे ते म्हणाले. घटनादुरुस्तीच्या विधेयकावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मंत्र्यांना काढण्यासाठी 30 दिवसांचे विधेयक कशाला? यामागे नेत्यांचा आत्मविश्वास ढासळल्याचेच दिसते, असे त्यांनी ठणकावले. आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याबाबत बोलताना त्यांनी सत्तेचा मार्ग खडतर असल्याचे सांगितले. आंबेडकरी नेते एकजुटीने लढत आहेत. पण सत्तेसाठी त्यांना वीस वर्षे थांबावे लागेल.

समाजातील 30 टक्के वर्ग वंचितांना मत देणार नाही, कारण त्यांना स्पर्धेची भीती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही, सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. पण त्यासाठी वेळ लागेल, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावरही आंबेडकरांनी जोरदार टीका केली. जरांगे रयतेतील मराठ्यांसाठी लढत असल्याचे सांगतात. पण त्यांचे राजकारण निजमाताली मराठ्यांसाठी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना गरीब मराठ्यांसाठी लढण्याची संधी होती. पण त्यांनी ती गमावली. आता पुन्हा आंदोलनाची भाषा करून ते लोकांचा उत्साह फक्त ढवळत आहेत, असे आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या या तिखट वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.

Rahul Gandhi : गुजरातच्या राजकारणात गुप्त धनाचा स्फोट

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!