महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मोदींनी केली राहुल गांधी यांची म्याऊ

OBC: आरक्षण संपवण्याचा कट; आंबेडकरांचा इशारा

Post View : 36

Author

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांची तुलना मांजराशी करत भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे आरक्षणविरोधी असल्याचा गंभीर आरोपही केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांची तुलना “मांजराशी” करताना भाजपवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, मोदींनी राहुल गांधींना इतके कमकुवत करून टाकले आहे की, आता ते फक्त नाममात्र विरोधक राहिले आहेत.

रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि आरएसएस हे सगळेच आरक्षण विरोधी असून, ते संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. देशात आरक्षण टिकवायचे असेल, तर या पक्षांपासून सावध राहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.

Mahayuti: शिंदे-अजित पवार ‘हम आपके हैं कौन’ मोडमध्ये

पिंजऱ्यात अडकलेली मांजर

आंबेडकर यांनी आपल्या भाषणात राहुल गांधींवर तीव्र टीका केली. त्यांच्या मते, मोदींनी राहुल गांधींना इतके असहाय्य करून टाकले आहे की, ते स्वतःच संकटात सापडले आहेत. राहुल गांधींची अवस्था मांजरासारखी आहे. मोदींनी सरळ सांगितले, तोंड उघडले तर तुरुंगात टाकू. आता सांगा, तो स्वतःसाठी लढेल की तुमच्यासाठी? असा खडा सवाल आंबेडकरांनी केला.

राहुल गांधींना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. ते जनतेसाठी लढण्याच्या स्थितीतच नाहीत. त्यामुळे विरोधकांकडून कोणतीही ठोस लढाई होईल, अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे, असेही आंबेडकर सुचवत होते. त्यांच्या मते, जनतेने स्वतःच्या हक्कांसाठी स्वतः लढायला हवे, कारण काँग्रेसवर विसंबून राहणे म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे.

Congress : वडेट्टीवार यांचा भाजपवर वार उलटून

संविधान धोक्यात

आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका करत त्यांना भाजप आणि आरएसएसच्या जोडीदार म्हटले. या पक्षांनी आरक्षण टिकवण्यासाठी काहीच केले नाही. उलटपक्षी, त्यांनी आपले हितसंबंध जोपासले आणि सामाजिक न्यायाची चेष्टा केली, असे आंबेडकर म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ देत सांगितले की, सरकार आरक्षण संपवण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्यांना पुन्हा लाभ मिळणार नाही. आता सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन केली आहे. म्हणजेच, हा संपूर्ण खेळच आरक्षण संपवण्याचा आहे, असे आंबेडकर म्हणाले.

Mahakumbh: हिंदूत्व केवळ शब्दांपुरतं मर्यादित

मशाल पुन्हा पेटेल?

आंबेडकर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सामाजिक चळवळीबद्दल भाष्य करत सांगितले की, सध्या फुले-शाहू-आंबेडकरी जनतेची मशाल मंदावली आहे. ही मशाल पुन्हा पेटेल, तेव्हाच संविधान बदलू पाहणाऱ्यांना आपण रोखू शकू. अन्यथा, आरक्षण आणि सामाजिक न्याय इतिहासजमा होईल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेले विधान अत्यंत स्फोटक होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मोदी सरकार संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या षड्यंत्रात भाजपसोबत आहेत. आता वेळीच जागे झालो नाही, तर आरक्षण आणि सामाजिक न्याय कायमचा नष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!