
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अकोल्याचे अनेक पर्यटक तिथे अडकले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे हे पर्यटक सुखरूप महाराष्ट्रात परतले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण खळबळ उडवून दिली. या भ्याड हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या भागात अडकले होते. विशेषतः अकोला व इतर भागांतील जवळपास 30 पर्यटकांचा गट श्रीनगरमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. या कठीण प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने लक्ष घालून महाराष्ट्र सरकारकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. पर्यटक परतले तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडून पर्यटकांचे स्वागत करण्यात आले.

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधत अडकलेल्या नागरिकांची काळजी व्यक्त केली होती. या परिस्थितीला गांभीर्याने घेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पर्यटकांसाठी विशेष विमानाची तातडीने व्यवस्था करण्याची विनंती केली. या घटनाक्रमामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या तत्परतेचे कौतुक झाले आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांनी वंचित बहुजन आघाडीच्या या मदतीबद्दल मनापासून आभार मानले आहेत. जेव्हा हे सर्व पर्यटक मुंबई विमानतळावर पोहोचले, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले.
Amit Shah : पाकिस्तान्यांना भारतातून हाकलण्याचा मोटा भाईंचा आदेश
संकटात दिलासा मिळाला
उपस्थित पर्यटकांनी बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचा विशेषतः उल्लेख करत त्यांचे आभार मानले. हे स्वागत फक्त एक औपचारिकता नव्हे, तर संकटाच्या काळात दिलेल्या आधाराचे प्रतीक होते. देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आमेबेडकर यांच्या चर्चेनंतर महाराष्ट्र सरकारने कोणतीही विलंब न करता दोन विशेष विमानांची तात्काळ व्यवस्था केली. ही विमाने दुसऱ्याच दिवशी श्रीनगरकडे रवाना झाली, ज्यामुळे अडकलेले सर्व पर्यटक सुरक्षितपणे परत येऊ शकले. या योजनेत गिरीश महाजन यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन महाजन यांनी हालचाली अधिक गतिमान केल्या.काश्मीरमध्ये झालेल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश असल्याची दु:खद माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. राज्य सरकारने या संकटकाळात ठोस आणि जलद निर्णय घेत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.