महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मतांची चोरी ओळखली, पण उशिरा जाग आली

Rahul Gandhi : गांधींच्या मतचोरीच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Author

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील कथित मतचोरीवर निवडणूक आयोगाला धारेवर धरले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी यावर प्रतिक्रिया देत, सत्य उघड झालं, पण फार उशिराने, असा टोला लगावला.

लोकशाहीचा किल्ला ढासळतोय की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगावरच नव्हे तर काँग्रेसवरही रोष व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यावर पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला चढवला असला, तरी प्रकाश आंबेडकरांच्या मते हा आउशिरा आलेला न्यायाचा आवाज आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींचं कौतुक करताच त्यांच्यावर जोरदार टोलाही मारला. आंबेडकर म्हणाले, राहुल गांधी, तुमचं कालचं भाषण चांगलं होतं. पण जर त्या 76 लाख गूढ मतदारांच्या प्रकारावर प्रकाश टाकायचा होता, तर माझं निमंत्रण स्वीकारून काँग्रेसने ‘वंचित’सोबत उभं राहायला हवं होतं. आपण तेव्हाच एकत्र आलो असतो, तर ही लाजिरवाणी बाब आधीच समोर आली असती.

Bacchu Kadu : दिल्लीच्या राजकारणात मशाल अन् तुतारीचा जलवा

संगनमताने चोरी

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट गुरुवारी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याने खळबळ उडवली. त्यांनी आरोप केला की महाराष्ट्रात विधानसभेच्या आधीच्या काळात तब्बल 1 कोटी नवे मतदार यादीत सामील झाले. एवढेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 नंतर अचानक टक्केवारीत उसळी आली. जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत माहिती मागितली, तेव्हा आयोगाने मतदार यादी देण्यास नकार दिला आणि महत्त्वाचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व पाहता, मतदान आयोगाने भाजपसोबत संगनमत करत मतदान चोरले, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर काँग्रेसने आमच्याबरोबर वेळेवर भूमिका घेतली असती, तर देशाच्या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास बळकट झाला असता. त्यांनी असा उल्लेखही केला की, किमान काँग्रेसने चेतन अहिरे यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत तरी पक्षकार व्हायला हवं होतं. हे विधान म्हणजे एकप्रकारे काँग्रेसच्या अर्धवट सहभागावरची नाराजी व्यक्त करणारा हल्लाच होता.

सर्व घडामोडींमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि सत्ताधाऱ्यांच्या कथित हस्तक्षेपावर संशयाचे मळभ आणखी गडद झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील दाव्यांमुळे 2025 वर्षीच्या राजकीय वातावरणात नवा वादंग उभा राहिलाय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!