महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal: ड्रग्ज, हत्या, बलात्कार, अपमान; राज्याची सुरक्षा कोलमडली

Congress : महाराष्ट्राचे गृहमंत्री घाशीराम कोतवालच्या भूमिकेत

Author

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिस झोपले होते का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला केला आहे.

नागपुरात एकीकडे औरंगजेबाचा मुद्दा चव्हाट्यावर असतानांच मात्र दुसरीकडे मोठ्या वादळाला तोंड फोडणारी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या संरक्षणाखाली असतानाही पळून गेला. या घटनेने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती नाजूक झाली आहे, याचा पुनःप्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार आणि गृहविभागावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

सपकाळ यांनी प्रश्न केला आहे की, कोरटकरला पोलिसांनी संरक्षण दिले होते, तरी तो पळून गेला कसा? या प्रकरणात आयपीएस अधिकारी आणि गृहमंत्र्यांचा सहभाग आहे का? पोलिसांची मिलीभगत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांचा थेट सहभाग असल्याशिवाय ही घटना घडूच शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. दुसरा एक अपमान करणारा राहुल सोलापूरकर याला तर पुण्याचे पोलीस आयुक्त संरक्षण देत आहेत. छत्रपतींविषयी अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्यांना संरक्षण आणि सामान्य नागरिकांना मात्र कायद्याचा धाक नाही, हा नेमका कोणता न्याय आहे? पुण्यात कायदा सुव्यवस्था मोडीत निघाली आहे, शहरात गुन्हेगारी वाढली आहे.

Vijay Wadettiwar : काँग्रेसचा आणखी एक कागदी घोटाळा

Vijay Wadettiwar : काँग्रेसचा आणखी एक कागदी घोटाळा

पोलिसांचा धाक संपला

सपकाळ यांनी राज्यभरात घडणाऱ्या गुन्ह्यांकडेही लक्ष वेधले आहे. स्वारगेट बस स्टँडवर बलात्कार होतो, बीडमध्ये सरपंचाची क्रूर हत्या होते, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू होतो, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होते, दुसऱ्या मंत्र्याच्या मुलीची छेडछाड होते, आणि त्यांना स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागते. ही सगळी उदाहरणे काय सांगतात? राज्यात पोलिसांचा धाकच राहिला नाही. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, जनतेला आता आपल्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे.

सपकाळ यांनी सरकारच्या क्रूर धोरणांवरही हल्लाबोल केला. ‘मी औरंगजेबाच्या क्रूर राजवटीशी फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना केली, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. पण मी आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी माफी मागणार नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, ‘औरंगजेब जसा क्रूर होता, तसेच इंग्रजही जुलमी होते. इंग्रजांच्या हस्तकांनी त्यांच्यासाठी काम केले, पेन्शन घेतली. मग विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल असे लोकांची स्मारके उखडून टाकणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Nagpur Riots : रस्ते उघडले, पण काळजी घ्यावीच लागेल

Nagpur Riots : रस्ते उघडले, पण काळजी घ्यावीच लागेल

ड्रग्जचा महाजाळ

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर मानले जात असले, तरी आता ते ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. सपकाळ यांनी सांगितले की, गुजरातच्या कांडला बंदरातून येणाऱ्या ड्रग्जचे पुण्याशी थेट कनेक्शन आहे, पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. पोलिसांचे लक्ष दुसरीकडे आहे, शहरात ड्रग्ज माफियांना मोकळे रान मिळाले आहे.

महाराष्ट्राचा गृहविभाग नेमका कसा चालतोय? हा विभाग आता घाशीराम कोतवालप्रमाणे चालवल्या जात आहे का? असा उपरोधिक सवालही सपकाळ यांनी केला. सपकाळ यांनी राज्यातील गृहविभागाच्या गोंधळलेल्या कारभारावरही प्रकाश टाकला. ‘राज्यात गृहविभागाचा गोंधळ उडाला आहे. राज्याला आता पूर्णवेळ आणि सक्षम गृह मंत्री हवा. सरकार जर याकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल, तर जनता आता उत्तर मागेल’ असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Nana Patole : भंडारा-गोंदिया तलावांची बुडती नैया वाचणार का

Nana Patole : भंडारा-गोंदिया तलावांची बुडती नैया वाचणार का

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!