महाराष्ट्र

Pahalgam : बुलढाण्याचे नागरिक सुखरूप घरी

Buldhana : जम्मू-काश्मीरमधील दहशतीमधून महाराष्ट्राच्या माणसांची सुटका

Author

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. निष्पाप पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 28 जणांना प्राण गमवावा लागला. यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक तणावाच्या गर्तेत अडकले होते.

हल्ल्याच्या कठीण प्रसंगी केंद्र सरकारने तात्काळ हालचाल करत, नागरिकांना परत आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना राबवल्या. केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पर्यटकांची भेट घेतली आणि त्यांना घरी सुखरूप पोहचविण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली.

Dimpy Bajaj : पाकिस्तानला आता भारताची ताकद दाखवू

पर्यटक परतले

नागरिकांना परत आणण्याच्या प्रयत्नांतर्गत श्रीनगरमध्ये अडकलेल्या 47 नागरिकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. ही रेल्वे जम्मूहून भुसावळ आणि मलकापूर येथे पोहचणार आहे. गुरुवारी सकाळी स्वतः प्रतापराव जाधव श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी पर्यटकांना धीर देत त्यांच्या सुरक्षिततेसाठी व्यक्तिगत पातळीवर मदतीचा हात दिला. या रेल्वेने नांदुरा, खामगाव, शेगाव तालुक्यातील अनेक नागरिकांसह राज्यातील इतर भागांतीलही पर्यटक परतले. त्यांच्या सुखरूप आगमनाने त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

फडणवीस सरकारने तत्काळ निर्णय घेऊन दोन विशेष विमानांची व्यवस्था केली. एअर इंडियाच्या विमानाने 100 पर्यटक, तर इंडिगोच्या विमानाने 83 पर्यटक आज मुंबईत परत आणले. ही दोन्ही विमाने सायंकाळी मुंबईत दाखल झाली. राज्य सरकारने या विमानांच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

Sanjay Rathod : राष्ट्रहितासाठी कुठलीही तडजोड नाही

पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय

पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली. सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे. द्विपक्षीय व्यापारही बंद करण्यात आला. सार्क व्हिसा रद्द करत भारतीय लष्करी सल्लागारांना परत बोलावण्यात आले आहे. इस्लामाबादमधील भारतीय राजनयिकांची संख्या आता 30 वर आणण्यात येणार आहे. या संपूर्ण घटनाक्रमात बुलढाण्याच्या मातीतून देशाला एक दृढ संदेश मिळाला. तो म्हणजे, संकटातही संयम राखत, मजबूत नेतृत्वाखाली योग्य उपाययोजना राबवल्या जातात. प्रतापराव जाधव यांचा निर्णय मानवी संवेदनशीलतेचाही आदर्श ठरतो. त्यांच्या पुढाकारामुळे बुलढाण्याचे नागरिक सुखरूप घरी परतले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!