महाराष्ट्र

Pravin Datke : नागपूर विकासासाठी बुलंद झाला दमदार आवाज

Maharashtra Budget Session : उपराजधानीच्या विकासचं नवं ब्लूप्रिंट

Share:

Author

नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत ठोस मागण्या मांडल्या.

नागपूर हे महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसलेले शहर विदर्भाची राजधानी म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून नागपूरचे महत्त्व मोठे आहे. भारताच्या भौगोलिक केंद्रबिंदूवर वसलेल्या या शहराला ‘ऑरेंज सिटी’ म्हणूनही संबोधले जाते. नागपूरच्या वेगवान विकासाला चालना देण्यासाठी मोठमोठ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सत्र मुंबईत सुरु आहे . दरम्यान शहराच्या विकासाला चार चांद लागतील अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी या अधिवेशनात केली आहे.

नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधांच्या उन्नतीसाठी प्रवीण दटके यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी IGMC आणि GMC येथे डॉक्टरांसाठी वसतिगृह उभारणीसाठी निधी, तसेच रवी भवन, नाग भवन आणि आमदार निवासाच्या पुनर्विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी केली. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी निधी तातडीने वितरित करावा आणि डागा रुग्णालयाच्या सुविधा सुधारण्यासाठी नव्या मशिनरीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरावीत, जेणेकरून नागपूरकरांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील, अशी त्यांची आग्रही भूमिका होती.

Chhatrapati Shivaji Maharaj : सत्ताधाऱ्यांचे कथित खास कोरटकर अडचणीत

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

विधानसभेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक देखील मांडण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची मागणी लावून धरली. शहराच्या आजूबाजूच्या शेतजमिनींसाठी रेडिरेकनर दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. शासनाने नझूल जमिनींसाठी दोन टक्के दराने फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर शेतजमिनींसाठीही दोन टक्के दर लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

महसूल मंत्र्यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी शेतजमिनींसाठी रेडिरेकनर दर 25 टक्के ने कमी करून पाच टक्के करण्याची घोषणा केली. यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक सवलत मिळणार आहे आणि त्यांची मालमत्ता अधिकृतरित्या त्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

Raj Thackeray : मनसेच्या मुख्य ‘इंजिन’ चालकाकडून भैय्याजींबाबत ‘चेन पुलिंग’

ठोस पावले

महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे एक महत्त्वाचे शहर आहेत. आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि नागरी सुविधांसाठी ते ओळखले जाते. सध्या शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मिहान (MIHAN) प्रकल्प, मेट्रो विस्तार, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्ते आणि वाहतूक सुधारणा यांसारख्या उपक्रमांमध्ये वेग आला आहे. असे असतानाही नागरी सुविधांच्या बाबतीत आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.

शहरातील आरोग्य सुविधा अद्ययावत होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये वसतिगृह, उपकरणे, आणि कर्मचारी यांची कमतरता भरून काढावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, नागपूरच्या ऐतिहासिक आणि प्रशासकीय इमारतींच्या पुनर्विकासासाठीही त्यांनी जोरदार मागणी केली.

Beed : धनंजय मुंडेंच्या सोबतचा ‘हा’ तरुण कोण…

नागपूरकरांसाठी पुढील दिशा

प्रवीण दटके यांच्या या मागण्यांमुळे नागपूरच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. विशेषतः आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण यांसारख्या विषयांना प्राधान्य दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना थेट फायदा होईल. नागपूर हे केवळ विदर्भाची राजधानी नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे शहर आहे. त्यामुळे येथील नागरी सुविधांचा विकास हा केवळ स्थानिक नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!