उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे पोलिस अधीक्षक असलेल्या अधिकाऱ्याच्या प्राचार्य भावानं भंडाऱ्यात नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींकडं शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रायपूर येथील एम्समध्ये ट्युटर, नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात गैरप्रकारामुळं वादात सापडलेल्या एकानं भंडाऱ्यातील शासकीय नर्सिंग कॉलेजमधील अनेक विद्यार्थिनींकडं शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी कॉलेजचे प्रायार्च किरण मुरकुटे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. किरण हा उत्तर प्रदेशातील लखनऊच्या पोलिस अधीक्षकाचा भाऊ आहे. यापूर्वी त्याला रायपूर येथील एम्समधून निलंबित करण्यात आलं होतं.
परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी मुरकुटे यानं सगळ्या विद्यार्थिनींकडं शरीर सुखाची मागणी केली होती. यासंदर्भातील चॅटिंगचे स्क्रिनशॉट विद्यार्थिनींनी काढले होते. त्यानंतर या सर्वांनी भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडं सामूहिक लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर एकूण 12 जणांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी नऊ महिला आहेत. एएनएम आणि जीएमएम कॉलेजमध्ये या विद्यार्थिनी शिक्षक घेत होत्या.
Whats App वर मॅसेज
भंडारा पोलिस ठाण्यात यासंदर्भात 21 वर्षीय विद्यार्थिनीनं तक्रार दाखल केली. 2023 पासून ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या विद्यार्थिनीसह काहींचे पेपर बॅक राहिले होते. त्यामुळं त्यांनी प्राचार्य किरण मुरकुटे यांना परीक्षेबाबत विचारणा केली. 08 नोव्हेंबर रोजी किरण मुरकुटे यांनी विद्यार्थिनीला मोबाइलवरील व्हॉट्सअॅपवर मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली. संबंधित मुलीकडं किरण याने आक्षेपार्ह फोटोही मागितले. या विद्यार्थिनीनं आपल्या मैत्रिणींना हा प्रकार सांगितल्यानंतर सगळ्यांनीच आपल्यालाही असा मेसेज आल्याचं तिला सांगितलं.
विद्यार्थिनींनी भीतीपोटी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर त्यांनी प्राचार्यांना ब्लॉक केले. मात्र किरण यांनी फोन करून विद्यार्थिनीला सुट्टीचा अर्ज करून सोबत चलण्यास सांगितलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थिनी घरी गेल्या. 9 जानेवारी 2025 रोजी रिलिव्हिंग लेटर देणार असल्याचं किरण यानं विद्यार्थिनींना सांगितलं. 26 डिसेंबरला विद्यार्थिनींचे पालक त्यांना घेण्यासाठी कॉलेजमध्ये आलेत. मात्र प्राचार्यांनी पाच मुलींना घरी सोडण्यास नकार दिला. त्यामुळं दोन विद्यार्थिनींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.