महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्येप्रकरणी Beed नंतर Buldhana येथे मोर्चा

सिंदखेडराजा येथे Maratha समाजाकडून निषेध 

Author

बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटले. या हत्याकांडाच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून महायुती सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली. आता विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही मोर्चा काढण्यात आला आहे. सिंदखेडराजा येथे मराठा समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला. सिंदखेडराजा येथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला.

राजवाड्यासमोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या मुलीने जनसमुदायाला संबोधित केले. आम्हाला न्याय देण्यासाठी समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. आंदोलनातील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.

राज्यभर Protest

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन (Santosh Deshmukh Murder case) राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेच्या विरोधात बीडनंतर धाराशिव मध्येही मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करा. खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार आहे. त्यालाही अटक करण्याची मागणी करण्यात आली.

देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वच नेत्यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिला आहे. धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप आहे. पोलिस यंत्रणा व सरकावर सतत दबाव वाढत आहे. त्यामुळे वाल्मीक कराड शरण येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Police तपास संथ

सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संथपणे तपास सुरू असल्याचा आरोप आहे. अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळले आहेत. बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी झाली आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेले एका महिलेची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनात आरोपींचे मोबाइल फोन सापडले आहेत.फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील सीआयडी कडून दाखल झाला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!