महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : कोथरूड पोलिस न्याय देण्याऐवजी छळात गुंतलेत

Dalit Women Abuse : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

Author

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन दलित तरुणींवर जातीय शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे.

पुण्यातील कोथरूड पोलिसांवर दलित तरुणींच्या छळाचा गंभीर आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून ती आपल्या तीन मैत्रिणींकडे पुण्यात आली होती. मात्र, या तीन तरुणींच्या घरात पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोलिसांच्या वर्तणुकीवर निशाणा साधत त्यांची कर्तव्यपरायणता आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विशेषतः विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांनी केल्या गेलेल्या अन्यायावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर तगादा लावून म्हटले की, पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे सदाचाराचा रक्षण आणि दुष्टांचा नाश. मात्र, पुण्यातील कोथरूड पोलिसांनी न्याय देण्याऐवजी या दलित तरुणींवर अत्यंत वाईट प्रकार केला आहे. घरात घुसून मारहाण करणे, जातीवाचक शब्दप्रयोग करणे हे कधीच पोलिसांचे कर्तव्य होऊ शकत नाही. ही घटना महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धक्का आहे. वडेट्टीवार म्हणाले की, महिलांवर अन्याय थांबवता येत नसेल, तर निदान पोलिस स्थानकात न्याय मागायला आलेल्या महिलांवर अन्याय कधीही करू नका.

Chandrashekhar Bawankule : सैन्याचे मनोबल खचवणाऱ्या राहुल गांधीचे वक्तव्य देशद्रोही

न्यायासाठी सामाजिक दबाव

कायदा ज्यांनी हातात घेतला आहे, त्यांच्यावर त्वरित एफआयआर दाखल केली पाहिजे. त्यांना निलंबित केले पाहिजे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेविषयी जनतेत अविश्वास वाढत आहे. रोहित पवार यांनीही या प्रकरणावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यांनी विचारले आहे की, प्रचंड रोष असूनही कोथरूड पोलिसांनी एफआयआर का नोंदवली नाही? या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी कोण आहेत? त्यांच्यामुळे पोलिसांवर दबाव होता का? यांसारखे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत. या प्रकरणाचा थेट परिणाम म्हणून, सामाजिक कार्यकर्ते, वंचित, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन दिवसांपासून पुणे पोलिस आयुक्तालयात मध्यरात्री आंदोलन करत आहेत.

पोलिस जर प्रशासनच जनतेच्या तक्रारीला दुर्लक्ष करत राहिले, तर आमचा आवाज मात्र शांत होणार नाही, असे रोहित पवार यांनी ठामपणे म्हटले आहे. कोथरूड पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करुन दलित तरुणींचा छळ केला असा आरोप सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रचंड चर्चेला वळण देत आहे. विजय वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकरणांमुळे पोलिसांचा समाजातील अविश्वास स्पष्ट होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणेला त्वरित सुधारणेची गरज आहे. अन्यायग्रस्तांनाच न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी आपली भूमिका पारदर्शक आणि संवेदनशील ठेवावी, अन्यथा सामाजिक नालायकपणा वाढत राहील.

Chandrapur BJP : कार्यकारिणीच्या कलहामुळे उमटला भावनिक विदाईचा सूर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!