महाराष्ट्र

Pune Rape Case: गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही; परिणय फुके आक्रमक

Parinay Fuke: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई

Post View : 15

Author

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणावर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेमुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अवघ्या तीन दिवसांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधून काढण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर करण्यात आला. अखेर, पुणे पोलिसांनी 28 फेब्रुवारीला त्याला बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असून, सरकार न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Maharashtra: शहाबाजचा इशारा; मंत्रालय उडवण्याची पाकिस्तानी धमकी

गुन्हेगारांना सूट नाही

अमानुष घटनेवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पीडितेला पूर्ण न्याय मिळेल आणि गुन्हेगाराला कोणतीही सूट मिळणार नाही. राज्य सरकार आणि पोलीस दल या प्रकरणात अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी रात्रभर परिश्रम घेऊन आरोपीला पकडले आहे, आणि लवकरच या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला जाईल.

परिणय फुके यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार टीका केली. या संपूर्ण घटनेला वेगळ्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. राज्य गृहमंत्री कदम यांच्या वक्तव्यावर चुकीची टीका होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “गृहमंत्री यांनी कोणत्याही प्रकारे चुकीचे वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास केला जात आहे. आम्ही या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत,” असे परिणय फुके यांनी सांगितले.

Sanjay Rathod: पाप क्षालन अन् नव्या संधीचा स्वीकार

आरोपी अटक

घटनेनंतर आरोपीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला शोधले. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्हेगाराला पकडले. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, या घटनेचा संपूर्ण तपास सुरू असून, पोलिसांनी अतिशय जलदगतीने कार्यवाही केली आहे. योग्य वेळी तपासाची संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल. यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण असल्याचे सांगितले.

Nagpur Collector : डॉक्टरसाहेबांच्या कामानं देवाभाऊ खुश

राज्यभरातून संतापाची लाट

पुण्यातील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. समाजातील विविध स्तरांतील लोक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना यांच्याकडून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. परिणय फुके यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, कोणत्याही गुन्हेगाराला आम्ही सुटू देणार नाही. हे सरकार पीडितांसाठी आहे आणि आम्ही न्याय मिळवून देऊच.

परिणय फुके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण खूप महत्वाचे आहे. या प्रकरणात कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. प्रशांत कोरटकर जे फरार आहेत, ते सध्या फरार आहेत. त्यांचा देखील शोध घेतला जाईल, आणि आरोपी सोबतच प्रशांत कोरटकर यांच्यावर देखील योग्य ते कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!