महाराष्ट्र

Devendra Fadanvis : तलवारीत बंद इतिहास… आता पुन्हा उघडणार महाराष्ट्रात

Maharashtra : लंडनच्या लिलावातून भोसले घराण्याचा वारसा मायभूमीत पोहोचणार

Author

राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा ठाव पुन्हा लागला आहे. मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रात पुन्हा परतणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठा साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाचे प्रतीक असलेली राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर राज्य सरकारने खरेदी करून महाराष्ट्रात परत आणण्याची मोठी कामगिरी केली आहे. लंडनमधील एका आंतरराष्ट्रीय लिलावात ही तलवार विक्रीसाठी आली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक ठेव्याची परतफेड करण्याचा निर्णय घेतला. ही ऐतिहासिक घोषणा फडणवीस यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत या तलवारीचे फोटो आणि सविस्तर माहिती शेअर केली.

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडनमध्ये लिलावात निघाल्याची माहिती मिळताच राज्य सरकारने ती खरेदी केली आहे. ती आता पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे सरदार होते. त्यांच्या युद्धकौशल्यामुळे आणि प्रशासनिक क्षमतेमुळे त्यांना सेनासाहिबसुभा ही उपाधी देण्यात आली होती. 1745 सुमारास त्यांनी बंगालच्या नवाबांविरुद्ध मोहिमा राबवत मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल आणि ओडिशापर्यंत केला. दक्षिण भारतातही त्यांनी मोठा प्रभाव टाकला.

Cabinet Decision : घोटाळ्यांनी गाठली एक रुपयात विमा योजना

सांस्कृतिक ठेवा वाचवला

मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं की, ही तलवार केवळ एक शस्त्र नाही, तर रघुजी भोसले यांच्या शौर्याची आणि मराठा इतिहासाची आठवण आहे. या ऐतिहासिक खरेदीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विकास खारगे यांनी तातडीने पावले उचलली. काही तांत्रिक अडचणीमुळे ही खरेदी एका मध्यस्थामार्फत करण्यात आली. यासाठी राज्य सरकारकडून 47 लाख 15 हजार इतकी रक्कम खर्च केली जाणार आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली. ही तलवार मराठा शैलीतील परंतु युरोपीय फिरंग पद्धतीची आहे.

सोन्याचे नक्षीकाम, एकधारी पाते, आणि खास वैशिष्ट्य म्हणजे तलवारीच्या पाठीवर श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा असे सोन्याच्या पाण्याने लिहिलेले आहे. 1917 मध्ये नागपूरमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भोसले घराण्याच्या खजिन्यावर केलेल्या लुटीतून ही तलवार इंग्लंडमध्ये नेली गेली असावी. आता सुमारे दोन शतकांनंतर ही तलवार पुन्हा एकदा तिच्या मुळ गाभार्‍यात परत येत आहे. राजे रघुजी भोसले यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणे ही फक्त सांस्कृतिक परंपरेची पुनर्स्थापना नाही, तर एका गौरवशाली इतिहासाची साक्ष आहे. ही तलवार लवकरच महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवण्यात येईल, ज्यामुळे नवीन पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाची जाणीव होईल.

NCP : राजकारणाचे नवे घर, जुने चेहरे

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!