महाराष्ट्र

Nagpur Railway : गोंदिया स्थानकावर बेकायदेशीर पैशांची तस्करी हाणून पाडली

Gondia : सुरक्षा यंत्रणेची सतर्कता फळाला

Post View : 17

Author

गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. एका व्यक्तीकडून 9.60 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. पुढील चौकशीसाठी आयकर विभागाला माहिती देण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाने 2 एप्रिल रोजी मोठी कारवाई करत गोंदिया रेल्वे स्थानकावर एका संशयित इसमास 9 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम अवैधरीत्या वाहतूक करताना पकडले. सदर कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे नेण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

मंडळ सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार, रेल्वे मार्गे होत असलेल्या प्रतिबंधित वस्तूंच्या आणि रोख पैशांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी सतत मोहीम राबविली जात आहे. 02 एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टास्क टीम प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहायक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार, प्रधान आरक्षक जी.आर. मंडावी, प्रधान आरक्षक आर. रैकवार आणि गुन्हे गुप्तचर शाखा गोंदिया यांच्या सहकार्याने तपास मोहिम राबविण्यात आली. सायंकाळी पाच वाजता गोंदिया स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 03 वर एका व्यक्तीला काळ्या-निळ्या रंगाची पिशवी बाळगलेल्या स्थितीत पाहून चौकशी करण्यात आली.पिशवीतील रोख रक्कम 8 लाख 10 हजार रुपये असल्याचे त्याने सांगितले. अधिक तपासणी करताच त्याच्याकडून आणखी 1 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले. एकूण 9 लाख 60 हजार रुपये रोख सापडल्याने तपास अधिक गतीमान करण्यात आला.

Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांचे विचार सोडून मोघलशाही स्वीकारली 

प्रशंसनीय कामगिरी

संबंधित व्यक्तीकडे रेल्वे मार्गे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करण्यासाठी कोणतेही वैध दस्तऐवज नव्हते. त्यामुळे हा पैसा बेकायदेशीर मार्गाने वापरण्यात येत असल्याचा संशय निर्माण झाला. यासंदर्भात तातडीने नागपूरच्या आयकर विभागाला माहिती देण्यात आली. जप्त केलेल्या रोख रकमेसंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराचा शोध घेतला जात आहे.

कारवाईत टास्क टीम प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंग, सहायक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार, प्रधान आरक्षक जी.आर. मंडावी, प्रधान आरक्षक आर. रैकवार आणि गुन्हे गुप्तचर शाखा गोंदिया यांच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे अवैध आर्थिक व्यवहार उघडकीस आला.

Parinay Fuke : विषयांतर संभ्रम निर्माण करणे हीच ठाकरेंची रणनीती

तस्करीविरोधात कठोर पावले

रेल्वे सुरक्षा बल नागरिकांना आवाहन करते की, रेल्वे मार्गे प्रतिबंधित वस्तू, मादक पदार्थ, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदी तसेच मानवी तस्करीसंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा बल किंवा शासकीय रेल्वे पोलिसांना सूचित करावे. असे बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी दक्ष राहावे.

प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदेशाचा व्यापक प्रचार व प्रसार करून जनजागृती करावी. रेल्वे सुरक्षा बल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आणि तत्पर आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!