महाराष्ट्र

Nagpur : आक्षेपार्ह्य पोस्ट करणारा रजास सिद्दिक एटीएसच्या जाळ्यात

Rajaz Siddique : काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंध

Author

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नागपुरात केरळमधील पत्रकार रजास सिद्दिकला आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर आता राज्यपातळीवर कार्यवाही होणार आहे.

देशाच्या सीमावर्ती भागात भारत-पाकिस्तान संघर्षाने तापलेल्या वातावरणात, नागपुरात एका धक्कादायक घटनेने सत्ताधारांच्या मनांत खळबळ निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताने पाकिस्तानवर ठोस सैन्य कारवाई करून ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. ज्यामुळे देशात एक अभिमानाची लाट निर्माण झाली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय जवानांनी धैर्याने दहशतवाद्यांशी लढा दिला, ज्यामध्ये महिलांचा सहभागही ठळक ठरला. पण या युद्धभूमीवर सुरू असलेल्या लढ्याचा ठसा देशाच्या अंतर्गत घडामोडींवरही उमटत आहे.

केरळमधील 26 वर्षीय तरुण पत्रकार रजास सिद्दिक याने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेने नागपुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ उडाली आहे. नागपुर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असताना, नवीन माहिती समोर आली आहे की रजास सिद्दिक याचा नक्षलवादी आणि काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळे, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis : भाजपच्या हक्काचं घर आता बुलढाण्यात

कडक कारवाई गरजेची

तपास आता महाराष्ट्राच्या अँटी टेररिझम स्क्वाड (ATS) कडे सोपवण्यात आला आहे. रजास सिद्दिक हा पत्रकार असून, नुकताच दिल्लीतील एका परिषदेत सहभागी होऊन केरळला परतत होता. या परिषदेत नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता. ज्यामुळे त्याच्या हालचालींवर संशय वाढला आहे. नागपुरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या मोबाईलमधून ऑपरेशन सिंदूर आणि छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर आढळले आहेत.

रजास सिद्दिक नागपुरात एका मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबला होता. मात्र त्याच्या उपस्थितीचा हेतू संशयास्पद असल्याने अँटी नक्सल ऑपरेशन युनिटने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत नागपूर पोलिस आणि अँटी नक्सल ऑपरेशनचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत होते. या घटनेने ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी सैन्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा आणि सायबर स्पेसवरील धोका याकडे लक्ष वेधले आहे. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

Akola Shiv Sena : निवडणुकीच्या रणभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण सज्ज 

देशाच्या सुरक्षेच्या या महत्त्वाच्या काळात अशी घटना उद्भवणे, आणि त्यामागे असलेल्या जाळ्याचा तपास होणे, आता केंद्रीय आणि राज्यस्तरीय सुरक्षा यंत्रणांसाठी प्राथमिकता बनली आहे. नागपुरमधील हे प्रकरण पुढील काळात कोणत्या दिशेने वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!