प्रशासन

भंडारा Zilla Parishd साठी ‘एक का बीस’

विषय समिती सभापती निवडणुकीसाठी ठरला ‘रेट’

Post View : 34

Author

भंडारा जिल्हा परिषदेत वेगवेगळं राजकीय नाट्य घडत आहे. अध्यक्षपदानंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी काही सदस्यांना ऑफर देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक शनिवार, 7 फेब्रुवारीला होणार आहे. अशातच निवडणुकीपूर्वी पाच सदस्य ‘मिस्टर इंडिया’ झाले आहेत. या सदस्यांना आपला ‘हात’ धरावा यासाठी त्यांना स्पेशल ऑफर देण्यात येत आहे. त्यासासाठी त्यांना रेटही ठरविण्यात आला आहे. ‘एक का बीस’ अशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. 52 सदस्य असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत सध्या 51 सदस्यांना निवडणुकीत मतदान करता येणार आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचं सदस्यत्व रद्द झालं आहे. त्यामुळं उर्वरित 51 सदस्य सभापती निवडणुकीत भाग्यविधाता ठरणर आहे.

उरलेल्या 51 जिल्हा परिषद सदस्यांपैकी पाच सदस्यांवर मोठा खेळ खेळला जाणार आहे. हे पाच सदस्य सध्या गायब आहे. पाचही सदस्य ‘ईश्वराच्या’ छत्रछायेत असल्याचं सांगण्यात येत आहे. भंडाऱ्यातील एका आमदारानं त्यांच्या हातावर असं ‘घड्याळ’ बांधलं आहे की, ते मिस्टर इंडिया चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे गायब झाले आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी ते अवतरणार आहेत. या पाचही सदस्यांना आपल्या बाजुनं खेचण्यासाठी गल्लीतच नव्हे दिल्लीपर्यंत पोहोच असलेल्या एका नेत्यानं मोठी ताकद लावली आहे. त्यासाठी एक खास ‘खोका’ तयार ठेवण्यात आला आहे. या खोक्यातून पाचही सदस्यांसाठी ‘समर गिफ्ट’ बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.

सगळ्यांच्या नाकाखालून भंडारा Zilla Parishad मधून पाच गायब

प्रचंड ओढाताण

भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वत:हून भाजपकडं चालून आलं होतं. पण ‘दैव देते अन् कर्म नेते’ या म्हणीप्रमाणं अध्यक्ष पद भाजपला मिळविता आलं नाही. आता भंडाऱ्यात काँग्रेसचा अध्यक्ष आहे. उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे. आता उर्वरित सभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आपलेच सभापती व्हावे, यासाठी महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू आहे. याच चढाओढीतून पाच सदस्य सध्या एका नेत्यानं गळाला लावले आहेत. मात्र हा नेता मित्रपक्षांप्रती असलेला आपला धर्म विसरल्याचं आता बोललं जात आहे. याचा फायदा विरोधकांना होईल, असं दिसत आहे.

भाजप अन् Narendra Modi यांना इव्हेंट करून प्रसिद्ध राहण्याची सवय

पदासाठी असलेल्या या राजकीय चढाओढीतूनच पाच जिल्हा परिषद सदस्य गायब झाले आहेत. त्यात एक भाजप आणि चार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. पाचही सदसय गायब होताच भंडाऱ्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. या भूकंपाचे धक्के कोणाला बसणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. अशात भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला तर महायुतीसाठी हा धक्का ठरेल. महायुतीनं भाजपमध्ये बाजी मारल्यास काँग्रेसला त्याचा परिणाम सहन करावा लागेल. अशा चूरसपूर्ण सामन्यात गायब झालेले पाच सदस्य कोणाची ‘विकेट’ घेतात यावर सगळी ‘मॅच’ अवलंबून आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!