
राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांना मंत्री पदासाठी आशा निर्माण झाली होती. मंत्रिमंडळात नाव असण्याच्या चर्चेवर रवी राणा यांनी भाष्य केले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश तर महायुतीला प्रचंड यश प्राप्त झाले. महायुतीतील 230 आमदारांनी विजय मिळविला. महायुतीमधील तीनही पक्षांच्या उमेदवारांचा दणदणीत विजयी झाल्यानंतर, सर्वच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी नेत्यांची दावेदारी वाढली. मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी बडनेरा येथील आमदार रवी राणा यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आले होते. त्याबाबत काय घडले ते रवी राणा यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथ घ्यावी लागणार, असे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आठ दिवसांपूर्वी त्यांना सांगण्यात आल्याचे रवी राणा यांनी सांगितले. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशी सकाळीच मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, असे राणा म्हणाले. यावेळी थांबा भरपाई भविष्यात काढून देऊ. त्यामुळे यावेळी आपण मंत्री झालो नाही. आमदार बनून बनून मी त्रासलो आहे. मी मंत्री व्हावे असे मला सुद्धा वाटते, असे रवी राणा यांनी म्हणाले.

आमदार रवी राणा पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेकांना वाटत होते की, रवी राणा यांचा देखील पराभव व्हावा. पण मी विजय प्राप्त केला. राजकारणात माझी कोणाशी काहीही दुश्मनी नाही. अमरावतीचे नवे खासदार बळवंत वानखडे झाले. तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले होते. जिल्ह्यातील सर्व माजी आमदारांनी, सर्व द्वेष मिटवून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. आपण एकमेकांचे पाय खेचत राहिलो तर जनतेला न्याय देऊ शकणार नाही. जिल्ह्याला समोर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही रवी राणा म्हणाले.
आता Development साठी
12 जानेवारीला युवा स्वाभिमान पार्टीचा आणि माझा जन्म झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मला लोकांनी भरभरून प्रेम दिले. माझ्या नावाच्या रांगोळ्या देखील महिलांतर्फे काढण्यात आल्या होत्या. रस्ते सजविण्यात आले होते. 2024 मध्ये सर्व जनता बडनेरात निवडणूकमध्ये उभे आहे, असे दृश्य होते. मी यापूर्वी किती वेळा निवडून आलो. यापेक्षा लोकांच्या मनात माझ्यासाठी प्रेम आणि स्थान किती आहे, हे महत्वाचे असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
एखादा व्यक्ती किती जगला, यापेक्षा तो कोणासाठी जगला हे महत्त्वाचं आहे. अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असो की, तिवसा मतदारसंघातील माजी आमदार. अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने घरी चहा प्यायला बोलावले तर मी त्याचा सन्मान ठेऊन नक्कीच जाणार. विरोधकानाही मी आवाहन करतो. त्यांनी देखील माझ्या गंगा सावित्री निवास्थानी चहा घ्यायला यावे, असे म्हणत आपसातील मतभेद मिटवून एकत्र येण्याचा सल्ला देखील रवी राणा यांनी नेत्यांना दिला आहे.