महाराष्ट्र

सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या वक्तव्याचे पडसाद

मंदिराबाबत केलेल्या विधानावर उमटल्या प्रतिक्रिया

Author

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंदिराबाबत व्यक्त केलेल्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर, मशिदींच्या विवादाला घेऊन त्याचा राजकीय वापर होऊ नये, असं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉ. भागवत यांच्या वक्तव्यानंतर आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यलने देखील आपला सूर बदलला आहे. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचा पंचजन्यने आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे. असे वाद टाळणं गरजेचे आहे, असं लेखात नमूद आहे.

पांचजन्यने मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर साधुमंतांमध्ये याबाबत तीव्र पडसाद उमटले आहेत. कुंभमेळ्यात अनेक साधू महंत एकत्र जमले आहेत. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळं डॉ. भागवत यांच्या वक्तव्यानंतर दोन गट पडल्याचं दिसत आहे. ऑर्गनायझर पत्रानं देखील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वाक्याचे समर्थन केलं. त्यासोबतच पांचजन्य देखील डॉ. भागवत यांच्या वक्तव्याच्या बाजूनं उभे राहिले.

Communal वाद नको

गल्ली बोळात असे वाद उकरून काढत राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. पांचजन्यने अशी भूमिका मांडली आहे. मंदिर हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र त्याचा आता राजकीय स्वार्थासाठी वापर होत आहे. मंदिराबाबत अनावश्यक भ्रामक वाद निर्माण केले जात आहेत. सोशल मीडियामुळं वाद विनाकारण वाढत असल्याचंही डॉ. भागवत यांनी म्हटलं आहे. हेच मुद्दे पांचजन्यच्या अग्रलेखात मांडण्यात आले आहेत. मात्र याबाबत साधुमहंतांमध्ये याबाबत तीव्र पडसाद उमटत आहेत. एका गटानं मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. दुसरा गट मात्र त्यांच्या विरोधात आहे.

प्रत्येक मशिदीखाली शिवमंदिर शोधू नका, असं भागवत म्हणाले. याचा अर्थ संघ सौम्य भूमिका घेत आहे. अनेकांनी अनेकांनी अर्थ काढला आहे. त्यामुळं त्याला विरोधही होत आहे. प्रयागराज कुंभमेळात होणाऱ्या धर्म परिषदेत मोहन भागवत यांच्या विधानावर चर्चा होणार आहे. संघच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करत आला आहे. त्यामुळे विरोध करण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे. दास म्हणाले की, भारत अशांत होऊ नये, यासाठी भागवत यांनी ही भूमिका घेतली आहे. भागवत जेव्हाही काही बोलतात, त्यामागं त्यांचा सखोल अभ्यास असतो, असं ते म्हणाले. उभे झाले आणि बोलले असं त्यांच्याबाबत होत नसल्याचं दास म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!