महाराष्ट्र

Bacchu Kadu : गांधीगिरीची यात्रा सोडून आता भगतसिंगगिरीची मशाल पेटणार

Farmers Demands : सातबारा कोरा नाय झाला, तर रस्ते कोरे करतो

Author

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू म्हणत सरकारला थेट रस्त्यावर उतरून इशारा दिला गेलाय.

अमरावतीतील परतवाडा येथून सुरू झालेलं प्रहार जनशक्ती पक्षाचं चक्काजाम आंदोलन म्हणजे फक्त रस्त्यांवरचा रोष नाही, तर शोषण, दुर्लक्ष आणि खोट्या आश्वासनांवरचा थेट बंडाचा नारा होता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मुख्य मागणीसाठी विदर्भात पदयात्रा काढणारे आमदार बच्चू कडू आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. गांधीगिरीची भूमिका संपवून त्यांनी जाहीर केलं आता भगतसिंगगिरी सुरू झाली आहे.

24 जुलै रोजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे हजारोंच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उतरले. टायर जाळून, घोषणा देत, परतवाडा-अमरावती महामार्गावर चक्काजाम करण्यात आला. राज्यभरात एकाच वेळी अनेक ठिकाणी हे आंदोलन सुरू झालं आहे. त्यामागे सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांविरोधात वाढलेली असंतोषाची ज्वाळा आहे.

Yashomati Thakur : शेतकरीच नव्हे, आता कंत्राटदारही करतोय शासनामुळे देहत्याग

लढा उभारण्याची वेळ

या आंदोलनात बच्चू कडू यांनी भावनिक आणि आक्रमक दोन्ही भाष्य केलं. जगात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेत, पण इकडे मात्र भाव वाढतात. शेतकऱ्यांना उत्पादनाला भावच मिळत नाही. आत्महत्या करणं सोडून आता लढा उभारण्याची वेळ आली आहे, असं सांगताना त्यांची आवाजात असहायतेचा संताप स्पष्ट जाणवत होता. त्यांनी थेट इशारा दिला की, आता कोणतीही तारीख न देता आम्ही मंत्रालयात शिरू.

हे आंदोलन केवळ अमरावती किंवा विदर्भापुरतं मर्यादित नाही. नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरीमध्ये देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजामाचा बेत आखला होता. मात्र, आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी मध्यरात्री धरपकड केली. प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याबाबत खुद्द बच्चू कडूंनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट फोनवर संवाद साधत, ही कारवाई अन्यायकारक असल्याचं स्पष्टपणे सांगितलं.

Vijay Wadettiwar : हनीच्या थेंबात सत्तेचा साप; 50 मंत्र्यांचे मुखवटे गळणार

सरकारला हवी अशांतता

कर्जमाफी, शेतमजूरांचे हक्क, दिव्यांगांना मिळणाऱ्या योजना, मच्छीमार व मेंढपाळांच्या अडचणी, अशा साऱ्याच मागण्यांवर सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप करत कडूंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. सरकारला राज्यात शांती नको आहे, अशांतता हवी आहे, म्हणूनच ते आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय, असा जळजळीत आरोप त्यांनी केलाय.

प्रहार संघटनेचं पुढचं आंदोलन 29 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी होणार असल्याची घोषणा करत बच्चू कडूंनी सांगितलं की, हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है!” त्यांनी जाहीर केलं की आता सरकारचं नियंत्रण मोडलं गेलं आहे आणि हा लढा जनतेचा, जनतेसाठी, आणि जनतेच्या न्यायासाठी आहे. या चक्काजाम आंदोलनाने सरकारची झोप उडवली आहे. ‘गांधीगिरी’च्या काळात निष्क्रिय राहिलेल्या प्रशासनासमोर आता ‘भगतसिंगगिरी’चा आक्रमक पवित्रा उभा ठाकलाय. आंदोलन सुरू आहे… आणि हा जनलढा आता कुठल्याही एका पक्षाचा न राहता, शोषितांचं रौद्र रूप बनतोय.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!