महाराष्ट्र

Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्याला हवे होते एक कोटी

चोरट्याबाबत घरातील Helper कडून मिळाली माहिती

Author

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकुने हल्ला करण्यात आला आहे. सैफ अली खान यांच्या मुंबईतील राहते घरी ही घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या वेळी एक दरोडेखोर त्यांच्या घरात शिरला. या दरोडेखोराला अडविण्याच्या प्रयत्नात सैफ अली खान आणि त्यांच्या घरातील एक मदतनीस जखमी झाले आहे. साहेब अली खान यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही मधून या दरोडेखोराचा फोटो पोलिसांना प्राप्त झाला आहे. या दरोडेखोराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी एक दरोडेखोर शिरला होता. घरातील मदतनीसला धमकी देऊन एक कोटी रुपयांची मागणी या चोराने केली होती. घरात गोंधळाचा आवाज येताच सैफ अली खानने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यात हल्लेखोराशी झालेल्या झटापटीत सैफ अली खान यांच्या शरीरावर सहा जखम झाला आहेत, अशी माहिती आहे.

सैफवरील हल्ल्याबाबत Devendra Fadnavis थेटच बोलले..

अचानक केला Attack

पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, सैफ अली खानच्या घरातील मदतनीस महिलेला बाथरूमजवळ एक सावली आढळली होती. सुरुवातीला मदतनीसला वाटलं की, सैफ अली खान यांच्या पत्नी करीना कपूर त्यांच्या धाकट्या मुलाला बघायला आल्या असणार. परंतु नंतर मदतनीसला संशय आला आणि ती पाहणी करण्यासाठी त्या सावली जवळ गेली. तितक्यातच जवळपास 35 वयोगटातील एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. त्या दरोडेखोराने मदतनीसला धारदार शस्त्राने धमकावत गप्प राहायला सांगितले. पण तेवढ्यात तिथे दुसरी मदतनीस आली. त्या दोघींनी त्याला काय हवंय, अशी विचारणा केली असता त्याने एक कोटी रुपये मागितले होते.

घरात गोंधळ ऐकून सैफ अली खान त्यांच्या खोलीतून खाली आले. त्यानंतर सैफ व दरोडेखोरात झटापट झाली. याचदरम्यान सैफच्या शरीरावर सहा वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहे. दरोडेखोराने वार इतके निर्घृणपणे केले की, चाकूचे टोक सैफच्या मणक्यात घुसले होते. सैफला गंभीर दुखापत झाली आणि त्यावेळी ड्रायव्हर उपलब्ध नव्हता. त्यामुळे कुटुंबियांनी लगेच सैफचा मुलगा इब्राहिम अली खान याला मदतीसाठी बोलावले. आठव्या मजल्यावर राहत असलेले इब्राहिम आणि त्याची बहीण सारा अली खान दोघेही लगेच तिथे गेले. त्यांना कार ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कार चालवता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी सैफला तातडीने रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!