महाराष्ट्र

Nagpur Shiv Sena : जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?

Executive Committee : उपराजधानीतून समीर शिंदे आघाडीवर

Author

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटात संघटनात्मक बदल होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हे बदल होणार आहेत. यात नागपूरच्या जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच फेरबदल होणार आहे. उपराजधानी नागपुरातील कार्यकारिणीमध्ये बदलाचे संकेत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी नव्या व्यक्तीकडं येणार आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी नागपुरातून अनेक नावं चर्चेत आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सध्या माजी आमदार मनोहन चंद्रिकापुरे यांच्याकडं आहे. शिवसेनेची सध्या तीन विभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार तीन जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात येणार आहे. यात शिवसेना शहर प्रमुख समीर शिंदे, उपजिल्हा प्रमुख गणेश डोईफोडे, बंडू तळवेकर, सूरज गोजे, मंगेश काशीकर यांची नावं चर्चेत आहेत.

शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखपदी सध्या कार्यरत असलेले समीर शिंदे यांचं नाव सध्या जिल्हा प्रमुखाच्या पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे. संघटनेत शिंदे हे सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. नागपुरातील अनेक प्रभागांमध्ये त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेले नेटवर्क अत्यंत मजबूत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर समीर शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तेव्हापासून त्यांनी शिंदे सेनेची पाळंमुळं नागपूर शहरात घट्ट केली. पक्ष संघटनेत व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिंदे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Bhandara Sand Mafiya : कोथुर्णा खंबाटा गावातून वाळू तस्करीचा रहस्यमय मार्ग

दोन्ही ठिकाणी काम

दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम या मतदारसंघात शहर प्रमुख समीर शिंदे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. भविष्यातील शिवसेनेचा मार्ग त्यांनी या दोन्ही मतदारसंघात प्रशस्त करून ठेवला आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी नव्या दमानं जबादारी सोपविली आहे. शाखास्तरावर पक्षाची कार्यशक्ती वाढविली आहे. पक्षसंघटनेत निर्णय घेताना शिंदे यांनी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्यानं त्यांच्या नावाबद्दल सकारात्मक वातावरण आहे. रस्ते, पाणी, वीज पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या प्रश्नांवर समीर शिंदे यांनी सातत्याने ठोस पाठपुरावा केला.

Gulabrao Patil : शिंदे नेत्याने राजकारणाची फोडणी शाळांमध्येही लावली

सध्या नागपूर लोकसभा मतदारसंघात तीन नव्या जिल्हा प्रमुख पदांच्या संभाव्य नियुक्तींमध्ये समीर शिंदेंचं नाव अग्रस्थानी आहे. दक्षिण-पूर्व नागपुरातून गणेश डोईफोडे हे नावही चर्चेत आहे. डोईफोडे हे माजी नगरसेवक आहेत. शिक्षण समितीचे ते सभापती देखील होते. माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांना देखील महापालिकेत कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सूरज गोजे आणि मंगेश काशीकर यांच्या नावावरही नागपुरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तीन जिल्हा प्रमुख नेमायचे असल्यानं एकनाथ शिंदे कोणाच्या नावाला पसंती देतात याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!