प्रशासन

Bhandara : वाळू माफियांचा प्रशासनावर हल्ला

Sand Mafia : नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलावर धक्काबुक्की

Post View : 38

Author

भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा अराजकता माजवली आहे. नायब तहसीलदार आणि गावाच्या पोलीस पाटलाला वाळू तस्करीविरोधात तपासणी करताना धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा मुद्दा गाजत आहे. त्यानंतर विदर्भातील विविध भागांमध्ये वाळू तस्करीच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाने या तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू केली असली तरी वाळू माफियांची अतिक्रमणं थांबलेली नाहीत. भंडाऱ्यातही वाळू माफियांनी आपली मुजोरी दाखवली आहे. एका धक्कादायक घटनेत नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलाला शारीरिक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खमारी गावात ही घटना घडली. वाळू तस्करांनी परवानगी न घेता नदीतून वाळू उपसा सुरू केला होता. प्रशासनाच्या कारवाईला अडथळा आणण्यासाठी तस्करांनी नायब तहसीलदार आणि पोलीस पाटलासोबत धक्काबुक्की केली आणि वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वाळू तस्करीवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद मांडला आहे. या संदर्भात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.

Nagpur : उपराजधानीच्या बोगस शिक्षण विभाग घोटाळ्यात ईडीचे तास सुरू  

कडक कारवाईची आश्वासनं

मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ हस्तक्षेप करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चौकशी करण्याच्या आदेश दिले. या आदेशानंतर दोन महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले, ज्यात एक उपविभागीय अधिकारी (SDM) आणि एक तहसीलदार यांचा समावेश आहे. तथापि, भंडाऱ्यात स्थिती अजूनही सुधारलेली नाही. दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर इतर महसूल अधिकारी सावध झाले असले तरी, वाळू माफियांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. यावर अधिकाऱ्यांनी कडक कारवाईची आश्वासनं दिली असली तरी, वाळू तस्करी थांबविण्याच्या प्रयत्नांतून पुन्हा एकदा अपयश उचलल्याचं दिसत आहे.

नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार आणि पोलीस पाटल कुंवरलाल दमाहे हे खमारी गावात वाळू तस्करीची तपासणी करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी वाळू माफियांनी या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना शारीरिक मारहाण केली. वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आणि ग्रामस्थांनी वाळूच्या अवैध वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याची मागणी केली. घटनेबाबत मोहाडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन किती कडक कारवाई करते, यावर भविष्यातील कारवाईंचे स्वरूप अवलंबून आहे.

Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!