राज्यातलवकरचस्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचार प्रसाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. प्रचार-प्रसाराची धुमाकूळ सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते लाखोंचा खर्च करत आहेत. बॅनर, घोषणा आणि जाहिरातींमुळे निवडणुकीला एक वेगळाच रंग येतो. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी निवडणुकीतील खर्चाबाबत बोलताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो.
महागडा खेळ स्पष्ठ करत त्यांनी महायुतीला एकत्रितपणे लढण्याची विनंती केली. बुलढाणा येथे बोलताना गायकवाड म्हणाले, आम्ही शिवसेना-भाजप महायुतीला प्राधान्य देणार आहोत. पण ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभेत युती होते, पण स्थानिक पातळीवर छोट्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यांनी पैसे खर्च करून मातीत जायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला. निवडणुकीत कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो, असंही ते म्हणाले. गायकवाड यांनी सांगितले की, लहान कार्यकर्त्यांना हा खर्च झेपणार नाही. त्यामुळे युती आवश्यक आहे.
आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक सोप्या राहिल्या नाहीत. एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी रुपये खर्च होतो आणि काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात, असं ते म्हणाले. इतक्या प्रचंड खर्चामुळे कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हा खुलासा ऐकून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत पैसा आणि सत्ता यांचा खेळ कसा खेळला जातो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. ज्याला जशी सवय, तशी वक्तव्ये. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, संजय गायकवाड सत्य बोलतात आणि सत्य करतात. तीन कोटी रुपये आणि शंभर बोकडे. किती बोकडं पोसून ठेवली आहेत. किती कोटी जमा केले आहेत? किती कोटी देणार आणि किती बोकडे देणार, यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागेल. ही टीका ऐकून राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा लोकशाहीचा पाया असतो, पण त्यात पैशाचा इतका मोठा खेळ होत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय? गायकवाड यांच्या वक्तव्याने हे सत्य समोर आले आहे की, निवडणूक आता श्रीमंतांसाठीच राहिल्या आहेत. छोट्या कार्यकर्त्यांना या महागड्या खेळात भाग घेणे शक्य नाही. महायुतीच्या नेत्यांना याची जाणीव झाली पाहिजे, असा संदेश ते देत आहेत.
Maharashtra : स्थानिक निवडणुकीचा रंगमंच; पैसा, प्रचार अन् कार्यकर्त्यांचा संघर्ष
Sanjay Gaikwad : प्रामाणिकपणा नाही तर बंडाचा सूर
Author
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. प्रचार-प्रसाराची धुमाकूळ सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते लाखोंचा खर्च करत आहेत. बॅनर, घोषणा आणि जाहिरातींमुळे निवडणुकीला एक वेगळाच रंग येतो. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी निवडणुकीतील खर्चाबाबत बोलताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो.
महागडा खेळ स्पष्ठ करत त्यांनी महायुतीला एकत्रितपणे लढण्याची विनंती केली. बुलढाणा येथे बोलताना गायकवाड म्हणाले, आम्ही शिवसेना-भाजप महायुतीला प्राधान्य देणार आहोत. पण ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि लोकसभेत युती होते, पण स्थानिक पातळीवर छोट्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यांनी पैसे खर्च करून मातीत जायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकला. निवडणुकीत कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो, असंही ते म्हणाले. गायकवाड यांनी सांगितले की, लहान कार्यकर्त्यांना हा खर्च झेपणार नाही. त्यामुळे युती आवश्यक आहे.
वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया
आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक सोप्या राहिल्या नाहीत. एक-एक, दोन-दोन, तीन-तीन कोटी रुपये खर्च होतो आणि काही ठिकाणी शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात, असं ते म्हणाले. इतक्या प्रचंड खर्चामुळे कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. हा खुलासा ऐकून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत पैसा आणि सत्ता यांचा खेळ कसा खेळला जातो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. ज्याला जशी सवय, तशी वक्तव्ये. त्यांना खोके आणि बोक्यांची सवय लागलेली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, संजय गायकवाड सत्य बोलतात आणि सत्य करतात. तीन कोटी रुपये आणि शंभर बोकडे. किती बोकडं पोसून ठेवली आहेत. किती कोटी जमा केले आहेत? किती कोटी देणार आणि किती बोकडे देणार, यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागेल. ही टीका ऐकून राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा लोकशाहीचा पाया असतो, पण त्यात पैशाचा इतका मोठा खेळ होत असेल तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय? गायकवाड यांच्या वक्तव्याने हे सत्य समोर आले आहे की, निवडणूक आता श्रीमंतांसाठीच राहिल्या आहेत. छोट्या कार्यकर्त्यांना या महागड्या खेळात भाग घेणे शक्य नाही. महायुतीच्या नेत्यांना याची जाणीव झाली पाहिजे, असा संदेश ते देत आहेत.
Related Post
Vijay Wadettiwar : पूरग्रस्त मराठवाड्यात विद्यार्थी अडचणीत
Vijay Wadettiwar : संकटात सापडलेल्या बळीराजाला सोडून ‘संकटमोचक’
Nana Patole : नेत्यांचे अकाउंट हॅक मग गोल्डन
Sajid Khan Pathan : तीन महिन्यांची प्रतीक्षा संपवून
Parinay Fuke : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय
Vijay Wadettiwar : ओबीसींच्या हक्कांसाठी पूर्व विदर्भातून भडकली
Nitin Gadkari : हलबा समाजाच्या स्वप्नांना शिक्षण अन्
Subhash Dhote : अकरा महिन्यांचा तपास अजूनही गुलदस्त्यात
Vijay Wadettiwar : बोगस दाखल्यांनी आरक्षणाला घाला
Chandrashekhar Bawankule : ओबीसींच्या नावावर राजकारण नको