महाराष्ट्र

Sapna Munagntiwar : समाजकारण, देशभक्ती, देवभक्तीचा मिलाफ

Women's Day Special : सपना मुनगंटीवार यांचे सुधीर मुनगंटीवारांना दहा हत्तीचे बळ

Author

सुधीर मुनगंटीवार म्हणजे जनतेच्या विश्वासाचं दैवत. सपना मुनगंटीवार म्हणते समर्पण, भक्ती आणि समाजसेवेचा नवा अध्याय. एका राजकीय नेतृत्वाचा आणि त्याच्या सावलीसारख्या खंबीर साथिदाराचा हा प्रेरणादायी प्रवास.

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार हे सूर्याप्रमाणे तळपणारं नाव आहे. ‘एक बार जो कमिटमेंट कर दिया तो समझो पुरा हुआ’ अशी त्यांची ख्याती आहे. जनतेप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण करताना अनेकदा व्यक्तीला कौटुंबिक जबाबदाऱ्यांना दुय्यम स्थान द्यावं लागतं. मात्र या सर्व प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी. सपना मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार यांचं राजकीय आणि सामाजिक योगदान जितकं उज्ज्वल आहे, तितकंच सपना यांचं कार्यही समाजात प्रकाश देणारं आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावत सपना मुनगंटीवार केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत नाहीत, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अथक कार्य करतात.

सपना मुनगंटीवार यांनी आपल्या कर्तृत्वाने चंद्रपूर आणि परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आर्य वैश्य समाजापासून ते सर्वसामान्यांपर्यंत विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विशेष म्हणजे त्या तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या विश्वस्तही आहेत. या माध्यमातून त्या महाराष्ट्रातील असंख्य बालाजी भक्तांना लक्ष्मीपती बालाजींचं दर्शन सहज उपलब्ध करून देतात. सुधीर मुनगंटीवार हे ‘दिला शब्द, केला पूर्ण’ यासाठी ओळखले जातात. तर सपना मुनगंटीवार यांचं नाव चंद्रपूरच्या पंचक्रोशित सामाजिक उपक्रमांसाठी गाजते. त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य यांचा सुंदर समन्वय साधला आहे.

Bhandara-Gondia : यशस्वी व्यक्तीमत्वामागील सशक्त नारीशक्ती

यशामागील खरी लक्ष्मी

सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातील जनता ‘सामान्यांचे इच्छापूर्ती करणारे दैवत’ मानते. सुधीर मुनगंटीवार सामान्यांच्या सुखदु:खात धावून जातात. प्रसंगी दिवस आहे की रात्र हे देखील ते पाहात नाहीत. त्यांच्या या कार्याला सपना मुनगंटीवार प्रचंड ताकदीनं बळ देतात. लक्ष्मीच्या रूपानं सपना यांची साथ सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतीला आहे. पतीच्या राजकीय आणि सामाजिक कार्याला बळ देण्यासोबतच सपना मुनगंटीवार यांनीही सामाजिक कार्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या त्या विश्वस्त आहेत. महाराष्ट्रातून या प्रतिष्ठित पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. चंद्रपुरातील श्री कन्यका शारदोत्सव महिला मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्यांना ‘कर्तृत्वशालिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सपना मुनगंटीवार यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे भक्ती, समर्पण आणि नेतृत्व यांचा संगम. सुधीर मुनगंटीवार यांच्या साथीनं सपना मुनगंटीवार या सामाजिक उपक्रमात अत्यंत सक्रियपणे सहभागी होतात. सामाजिक कार्याच्या आपल्या अखंड सेवेतून त्यांनीही स्वत:ला सिद्ध केलं आहे. सपना यांचं तिरुपती बोर्डावरील योगदान मोलाचंच आहे. सुधीर मुनगंटीवार आमदार म्हणून विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करीत असताना सपना मुनगंटीवार या चंद्रपुरातील प्रत्येकाला मातृत्वाचा आधार देत असतात. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्या सगळ्यांना जपतात. त्यामुळंच चंद्रपूरकरांसाठी सपना मुनगंटीवार हे नाव म्हणजे सामाजिक कार्यालतील खऱ्या लक्ष्मी सारखे आहे.

Vidarbha : वैनगंगेचे पाणी अवतरणार बुलढाण्यात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!