
नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांचा बंगला चांगलाच हादरला. बंगल्यातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर सगळेच त्या दिशेने धावले.
नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांचा शासकीय बंगला. सगळं काही सुरळीतपणे सुरू होतं. एसपींचा बंगला म्हटल्यानंतर पोलिस विभागातील कर्मचारी दैनंदिन काम व्यस्त होते. अशातच अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर बंगल्यातील प्रत्येक जण आवाजाच्या दिशेनं धावला. आवाज ज्या भागातून आला, तिथे गेल्यानंतर सगळ्यांना कळलं की फायरींग झालं आहे. फायरींग कुणी केलं. त्यानंतर सगळा प्रकार लोकांच्या लक्षात आला. नेमका प्रकार कळल्यानंतर अनेकांना धक्काच बसला.
प्रत्येक जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात येतं. पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महत्वाच्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक पुरविण्यात येतो. यातील काही अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सशस्त्र पोलिस सुरक्षाही तैनात असते. आमदार, खासदार यांनाही सशस्त्र सुरक्षा रक्षक असतो. अशीच सुरक्षा नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांनाही पुरविण्यात आली आहे. अधीक्षकांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीवर तैनात असलेल्या एकानं ‘सर्व्हिस रिवॉल्व्हर’मधून अचानक गोळीबार केला.

सगळ्यांनाच धक्का
नागपुरातील जामठा परिसरातील वृंदावन सिटी येथे पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांचा अधिकृत बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात तैनात असलेल्या एका सुरक्षारक्षकाने ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’मधून फायरींग केली. शनिवारी, 18 जानेवारीला सकाळच्या सुमारास फायरींगची ही घटना घडली. त्यानंतर नागपूर पोलिस दलात मोठी खळबळच उडाली. विशाल तुमसरे असे फायरींग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. फायरींगनंतर विशाल यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशालची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिस कर्मचारी विशाल तुमसरे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. त्यामुळं त्यांनी सरकारी बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. मानसिक ताण, वैयक्तिक समस्या किंवा कौटुंबिक कारणावरून विशालनं असं केलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. विशाल शेअर बाजारात देखील गुंतवणूक करीत होते. त्यातून त्यांना मोठं नुकसान झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नुकसान वाढलं होतं. त्यातून तर त्यांनी हे कृत्य केलं नाही ना? असा तपास नागपूर ग्रामीण पोलिस करीत आहेत. मात्र विशाल यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानातील सगळेच हादरले आहेत. सध्या विशाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
प्रदेशाध्यक्षांचा Congress मधील पदाला ना..ना..; महाराष्ट्रात ‘अमित पर्व’
नगापूर जिल्ह्यात यापूर्वीही पोलिसांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये एका पीएसआयनं आपले प्राण गमावले होते. जून 2024 मध्ये नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील महिला प्रशिक्षणार्थीनं आत्महत्या केली होती. एप्रिल 2024 मध्येही सुराबर्डीत एका पोलिस कर्मचाऱ्यानं स्वत:वर फायरींग केलं होतं. सुमारे नऊ वर्षांपूर्वी एका पीएसआयनं नागपूर शहरात स्वत:वर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.