प्रशासन

Police Transfer : नागपूरच्या सुरक्षा रणभूमीत तीन अधीक्षकांचे आगमन

Maharashtra : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मोठी फेरबदल मोहीम

Author

महाराष्ट्र सरकारने नागपूर आणि अमरावतीसह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. नव्या नेमणुकीमुळे कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे.

महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत पुन्हा एकदा मोठा झटका देत, राज्य सरकारने 16 एप्रिल 2025 रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले. या बदल्यांनी संपूर्ण राज्यात, विशेषतः विदर्भातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. नागपूर आणि अमरावतीसारख्या प्रमुख शहरी भागांमध्ये नव्या पोलिस अधीक्षकांची नेमणूक झाल्याने आता कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात नवा चेहरा दिसणार आहे. या बदल्यांचा उद्देश म्हणजे पोलिस यंत्रणेत नवी ऊर्जा भरणे आणि अधिक परिणामकारक प्रशासन उभारणे आहे.

नागपूरसारख्या वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांशी झुंजणाऱ्या शहरात तीन नव्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची नियुक्ती ही एक निर्णायक पावले मानली जात आहेत. प्रवीण पाटील, वसंत परदेशी आणि राजेंद्र ढभाडे या तीन अनुभवी अधिकाऱ्यांना नागपूरच्या सुरक्षिततेची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या तिघांमध्ये प्रवीण पाटील यांचा अनुभव पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहेत. वसंत परदेशी पिंपरी-चिंचवडमधील पोलिस प्रशासन हाताळून सिद्ध झालेले अधिकारी आहेत. राजेंद्र ढभाडे हे देखील आपली जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडणारे म्हणून परिचित आहेत.

Nagpur : आक्षेपार्ह्य पोस्ट करणारा रजास सिद्दिक एटीएसच्या जाळ्यात

कायदा सुव्यवस्था बळकट

तिघेही नागपूर शहराच्या सुरक्षेच्या नव्या रणनीतीसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, नागपूरमध्ये याआधी कार्यरत असलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, एस. टी. राठोड आणि पी. पी. शेलके यांची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. संजय पाटील यांना पुणे शहरात नियुक्त करण्यात आले आहे. एस. टी. राठोड यांना अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाचे (Narcotics Task Force) आयजी बनवण्यात आले आहे. तर पी. पी. शेलके यांना मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) आयजीपदी बढती मिळाली आहे.

बदल्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची नियुक्ती म्हणजे ए. एच. चावरिया यांची. पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) म्हणून कार्यरत असलेले चावरिया आता अमरावती शहराचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. अमरावतीसारख्या संवेदनशील शहरासाठी चावरिया यांचा अनुभव निश्चितच मोलाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने 14 पोलिस अधीक्षकांची पदोन्नती करून त्यांना उपमहानिरीक्षक (DIG) या दर्जावर बढती दिली आहे. या पावलाने राज्यात वरिष्ठ पोलीस नेतृत्वात नवा उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis : भाजपच्या हक्काचं घर आता बुलढाण्यात

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!