प्रशासन

Nagpur : शालार्थ घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता संस्थाचालकांची गाठ

Bogus Teacher Scam : पदवी गाठली मेहनतीने, पण पद मिळाले नात्याने

Author

शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागात हजारो बनावट शिक्षक भरती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक अटकसत्र पार पडली असून एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वातानुकुलीत दालनात फाईली सरकत होत्या, पण निर्णय नव्हते. टेबलांवर ठेवलेले कागद हलकेच सांगत होते  इथे काहीतरी अघोषित सुरू आहे. अखेर, शालार्थ आयडी या संज्ञेने संपूर्ण शिक्षण यंत्रणेचा विसंवाद उघड केला. नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेच्या भक्कमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हा घोटाळा केवळ शिक्षक भरतीपुरता मर्यादित नाही, तर शिक्षण यंत्रणेत संगणकीय प्रणालीचा कसा गैरवापर होतो, याचेही चटपटीत उदाहरण आहे. यातून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गालबोट लागत आहे हे वेगळे सांगायला नकोच.

शिक्षक भरती घोटाळ्याचे मूळ आणखीनच खोलवर गेले आहे. यामध्ये केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर खासगी संस्थाचालकांचाही हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण उपसंचालक दर्जाचे पाच अधिकारी अटकेत आहेत, पण यापुढे संस्थाचालकांवरही एसआयटीचा करडा डोळा ठेवला जाणार आहे. 2019 ते 2025 कालावधीत तब्बल 1 हजार 56 शिक्षकांची बोगस भरती झाली. शालार्थ आयडीच्या नावाखाली शासनाच्या पैशांची लूट झाली. हा खेळ संस्थाचालक, उपसंचालक आणि वेतन अधीक्षकांच्या संगनमतानेच रंगला. सरकारी निधीतून कोट्यवधी रुपये लाटण्याचा हा नवा फॉर्म्युला बनवण्यात आला होता.

Maharashtra : ज्ञानयज्ञात ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा, पुन्हा सिद्ध होण्याची आली वेळ

आरोपी अद्याप फरार

अनेक शाळांमध्ये संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना शिक्षक म्हणून भरती केल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ पात्र शिक्षकांना पदोन्नती नाकारून नातेवाईकांना वरच्या पदावर बसवण्यात आले. हे सगळे संस्थाचालकांच्या अधिकाराचा गैरवापर करून घडले. तसेच, काही शिक्षकांचे वेतन रोखले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. पैशासाठी शिक्षकांचा छळ केला जात असल्याची माहितीही एसआयटीकडे पोहोचली आहे.या संपूर्ण प्रकरणात एसआयटीच्या चौकशीने वेग घेतला असून, दोघे मुख्य आरोपी नीलेश वाघमारे आणि मेंढे अद्याप फरार आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एसआयटी प्रमुख सुनीता मेश्राम यांनी स्पष्ट केलं की, संस्थाचालकांविरोधात तक्रारी मिळाल्या असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल. दरम्यान, अटकेत असलेले चिंतामण वंजारी, वैशाली जामदार आणि लक्ष्मण मंघाम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.वर्ष 2019 पासून धूसर पडद्यामागे सुरू असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची जी कथा आज उलगडते आहे, ती केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हे प्रकरण आता इतकं गाजतंय की त्याचे पडसाद थेट मंत्रालयाच्या भिंतींवर आदळले आहेत. कधी समित्यांमध्ये, कधी विधिमंडळात अनेक शिक्षक आमदारांनी या प्रकरणाचा आवाज उठवला. पण बराच काळ मौन हेच अधिकृत उत्तर ठरत होतं.

Atul Londhe : शिंदेच्या काळात आर्थिक राजधानीत साचले भ्रष्टाचाराचे पाणी

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!