महाराष्ट्र

Sharad Pawar : दोन चेहरे, 160 जागा अन् माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा

Nagpur : दिल्लीत झालेली गुप्त भेट आली जनतेसमोर

Author

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींच्या निवडणूक मतचोरी आरोपांना जोरदार समर्थन करत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार कामगिरी करत पुनरागमनाची चाहूल दिली होती. मतदारांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वारे वाहत होते. मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाने हा आनंद काहीसा कमी झाला. महायुतीने महाविकास आघाडीला मागे टाकत सत्ता परत मिळवली आणि राजकीय समीकरणांना नवे वळण दिले. या निकालानंतर काँग्रेसने मतचोरीचे गंभीर आरोप लावण्यास सुरुवात केली. 7 ऑगस्ट रोजी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत थेट निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला.

शरद पवार यांनी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली असे स्पष्ट आरोप करत पुरावे देशासमोर मांडले. या आरोपांमुळे देशभरात राजकीय खळबळ माजली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे, असे पवार ठामपणे म्हणाले. आयोगाने राहुल गांधींवर हलफनामा देण्याचा दबाव टाकणे हे अजिबात योग्य नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Akola BJP : निष्ठावानांसाठी उपवास, मोजक्यांसाठी मेजवानी खास

हलफनाम्याचा आग्रह चुकीचा

पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. आक्षेप आयोगावर आहे, मुख्यमंत्र्यांवर नाही. त्यामुळे उत्तर फक्त आयोगानेच द्यावे, इतरांनी नाही, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता. शरद पवारांनी पत्रकारांशी संवादात एक रोचक किस्सा उलगडला. विधानसभा निवडणुकींच्या घोषणेनंतर काही लोक दिल्लीमध्ये त्यांना भेटायला आले होते. ते दोन जण होते, त्यांनी नाव-पत्ता दिला नाही. मात्र त्यांनी हमी दिली की 288 पैकी 160 जागा ते जिंकून दाखवतील, असे पवारांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. पण नंतर त्यांची राहुल गांधींशी भेट घडवून आणली.

पवारांच्या मते, राहुल गांधींची अलीकडील पत्रकार परिषद ही सखोल अभ्यास, मेहनत आणि ठोस उदाहरणांवर आधारित होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी, असा त्यांचा आग्रह आहे. राहुल गांधींनी बनावट मतदानाची अनेक उदाहरणे सादर केली असून त्यामागचा आधारही दिला आहे. तरीही आयोगाने हलफनामा मागण्याचा आग्रह धरणे योग्य नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. घटनात्मक लोकशाहीबद्दल शंका निर्माण होणे धोकादायक आहे. त्यामुळे सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. दूध का दूध, पाणी का पाणी व्हावे, असे पवारांनी ठामपणे सांगितले. शरद पवारांच्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर तापमान चढले आहे. आता आयोगाची पुढील पावले आणि या प्रकरणातील तपासाचा परिणाम याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar : ऑटो चालकांच्या संघर्षाला यशाचा एक्सलेरेटर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!