महाराष्ट्र

Gulabrao Patil : शिंदे नेत्याने राजकारणाची फोडणी शाळांमध्येही लावली

Jalgaon : अभिनेत्रीपासून ते विद्यार्थ्यांच्या विभाजनापर्यंतचा पाटलांचा जिभेचा प्रवास

Post View : 41

Author

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जळगाव येथे त्यांनी शिक्षकांना विद्यार्थी फोडा असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शब्दांपेक्षा शालीनता हरवली आहे की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसाच्या पहाटेपासून रात्रीच्या अंधारापर्यंत, आरोप-प्रत्यारोपांची धग वाढताना दिसते. असभ्य भाषेत होणारे आरोप, एकमेकांची खिल्ली उडवणारी वक्तव्ये आणि त्यातून आपल्याच प्रतिष्ठेचे नुकसान करणारी वाक्य सध्या राजकारणाचा भाग बनली आहेत. या वादाच्या फेऱ्यात ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे शिक्षकांना राजकारणाचा सल्ला दिला आहे.

पाटील यांचे जुने विधान हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते अजून विसरले गेले नसतानाच, त्यांनी आता शिक्षकांना दिलेल्या सल्ल्यामुळे पुन्हा वाद पेटला आहे. जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना, पाटील यांनी आपल्या खास शैलीत वक्तव्य केले. माझ्याही शाळा आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 43 हजार विद्यार्थी होते. यंदा संख्येमध्ये वाढ नाही, असे सांगताना त्यांनी उपस्थित शिक्षकांना सल्ला दिला की, जसे आम्ही पक्षाचे लोक फोडतो, तसे तुम्हीही विद्यार्थी फोडा.

Chandrapur : वडेट्टीवारांनी खेचले गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत

शब्दांचा यू टर्न

पाटील यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर हास्याचं वातावरण तयार झालं असलं तरी, राजकीय वर्तुळात याला गंभीरपणे घेतलं जात आहे. मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची उपमा देणं, हे शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रासाठी योग्य आहे का, असा प्रश्न विचारला जातो आहे. वादळ उठल्यानंतर, गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत यू-टर्न घेत स्पष्ट केलं की मी ते विनोदाने बोललो. पक्षात जसा कार्यकर्त्यांना फोडून घेण्याचा प्रयत्न करतो, तसंच विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा सूचक आणि विनोदी सल्ला दिला होता. त्यामागे कोणताही अपमान करण्याचा हेतू नव्हता.

गुलाबराव पाटील यांचा हा विनोद त्यांचे जुने विधान आठवतो जेव्हा त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, माझ्या मतदारसंघात रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत केले. अशा प्रकारची वक्तव्यं एकदा नाही, तर अनेकदा घडली असल्याने, जिभेची घसरण हा नेहमीचा गुणधर्म ठरत चाललाय की काय, अशी कुजबुज सुरू आहे. राज्याच्या राजकारणात शाब्दिक मर्यादा ओलांडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वादग्रस्त विधानं ही टीआरपी मिळवण्यासाठीचा एक शॉर्टकट झालाय, असं काहींच मत आहे. मात्र, मंत्री आणि नेतेमंडळींनी आपल्या वक्तव्यातून समाजात चांगला संदेश दिला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.

Chandrapur : जल जीवन मिशन झाले लाचेचे सिंचन 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!