
गडचिरोली जिल्ह्यातून खंडणी गोळा केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी खंडणीचा आरोप केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विकासावरून सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी माओवादावरून शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. गडचिरोलीतील माओवाद संपल्यावरून सामनामध्ये फडणवीस यांची स्तुती करण्यात आली आहे. मात्र अशातच शिवसेनेकडून शिंदे यांना ‘टार्गेट’ करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना गडचिरोलीचे पाकलमंत्री एकनाथ शिंदे हे होते. त्यांनी खंडणी गोळा केल्याची टीका राऊत यांनी केली.
गडचिरोलीत या आधीच्या पालकमंत्र्यांचं काम आम्ही पाहिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एजंट नेमण्यात आला होता. हा एजंट नेमून खंडणी गोळा करण्याचं काम काही लोकांनी केलं. यापूर्वी देखील गडचिरोलीत खंडणी आणि हप्ते गोळा करण्याचं काम झालं. त्यातून माओवाद, गरीबी वाढली. या सगळ्यावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. राऊत यांनी शिंदे यांचं नाव न घेता टीका केली. एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकाचा आणि संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका, यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पुन्हा BJP सोबत जवळीक
शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा जवळ येत असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नेमकं काय सुरू आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. माओवाद हा गरीबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. माओवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल, तर ते विधायक काम आहे. त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे, असं सामनामध्ये लिहिण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा त्यांचं कौतुक केलं, असं राऊत म्हणाले.
चांगल्या कामाचं कौतुक करण्याची आमच्या पक्षाची आणि शिवसेना प्रमुखांची भूमिका राहिली आहे. गडचिरोलीत आणि जमशेदपूर येथे पोलाद शहर होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल माओवाद्यांनी शस्र खाली ठेवली. अनेकांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळे माओवाद सोडून तरुण जर संविधान हाती घेत आहे. असं होत असेल तर ही बाब उत्कृष्ट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच कौतुक का करू नये? गडचिरोली सारखा जिल्हा माओवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
गडचिरोलीत शेकडो पोलिसांचे बळी गेले. जमशेदपूरनंतर गडचिरोली हे पोलाद सिटी बनत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. हे राज्याच्या हिताचं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. नी संविधान हाती घेतलं. याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आणि भारतीयाला कौतुक असलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.