महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडाऱ्यात ठाकरेंची मशालच विझवली

Bhandara BJP : अख्ख्या पदाधिकाऱ्यांच्याच हाती दिलं कमळ

Post View : 93

Author

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं. महाविकास आघाडीच्या पतनापासून सुरू झालेली ही पडझड आजही थांबलेली नाही. अशात भंडाऱ्याचे भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्ह्यात उद्धव सेनेच्या मशालीची धगच विझवण्यास सुरुवात केली आहे.

राजकारणात अनेकांना ‘चेकमेट’ देण्यात तरबेज असलेल्या डॉ. परिणय फुके यांनी ठाकरेंच्या भंडाऱ्यातील गटात मोठा भूकंप घडविला आहे. शनिवारचा दिवस (3 मे) उद्धव सेनेसाठी भंडाऱ्यात हादरा देणारा ठरला. आमदार डॉ. फुके यांच्यावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहर समन्वयक, विभाग प्रमुख असे अनेक पदाधिकारी भाजपवासी झालेत. त्यामुळं भंडाऱ्यात आता उरल्यासुरल्या ठाकरे सेनेला या संकटाचा ‘सामना’ कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.

मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीतील काँग्रेसनं भंडाऱ्यात जिल्ह्यात डोकं वर काढू पाहिलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचं भाजपचा ‘गेम’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचेच पाय त्यांच्याच गळ्यात घातले. त्यानंतर डॉ. फुके यांनी पक्षविस्तार आणि पक्ष बळकटीच्या दृष्टीनं राजकारणाच्या सारीपाटावरील सोंगट्या फिट केल्या. काँग्रेसला धोबीपछाड दिल्यानंतर त्यांनी भंडाऱ्यात कशीबशी तग धरून असलेली ठाकरेंची मशाल विझवण्यासाठी पावलं उचलली.

बावा काही तर सोडा..

शनिवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ललीत बोंद्रे, शहर प्रमुख अशोक चुटे, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष राजू दुबे, भंडारा शहर समन्वयक टोमदेव तितीरमारे, विभाग प्रमुख शैलेश खरोले यांचा यात समावेश होता. याशिवाय गंगाधर निंबार्ते, प्रमोद बोरकर, विकास बागडे, संदीप गमने, प्रकाश गभणे, विजय धकाते हे देखील भाजपमध्ये आलेत. आकाश मनंदूरकर, रवी शेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. ठाकरे गटातील ही मंडळी भाजपमध्ये आल्यानं आता मशालीचा प्रकाश कंदीलासारखा झाला आहे. ठाकरे गटातून हे ‘आऊट गोइंग’ भविष्यातही कायम राहिल असं आता दिसत आहे.

Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित

पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा आमदार डॉ. परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात सन्मान केला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं गेल्या काही वर्षांत जोमानं काम केलं आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात जेवढं काम झालं, ते देशासाठी आदर्श ठरत आहे. त्यांच्या या कार्यानं प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. भंडाऱ्यातील पक्ष प्रवेश हा भाजपवरील विचारसरणीवरचा विश्वास दर्शविणारा आहे. आमदार डॉ. फुके यांनी खेळलेल्या या चालीमुळं भंडारा-गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीची पाळंमुळं आता कमकुवत होत चालली आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. ऐन उन्हाळ्यात पेटलेल्या या नाराजीच्या वैशाख वणव्यात महाविकास आघाडी नावाच्या वृक्षाची मोठी पानगळ होणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळं सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी डॉ. परिणय फुके नावाचा धसका घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवला पूर्व विदर्भातील हे नाव महाराष्ट्रातील दुसरा चाणक्य म्हणून भाजपमध्ये उदयास येऊ शकेल अशी परिस्थिती आता निर्माण होत आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!