संपादकीय/लेख

Ashish Jaiswal : कन्हानच्या सभेतून शिंदेंचा जयस्वालांना आशिष

Eknath Shinde : मतदारांच्या आभाराच्या निमित्तानं वाढविलं शिवसैनिकाचं बळ

Post View : 38

Author

विधानसभा निवडणुकीला आता बरेच दिवस झाले आहेत. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर झालं आहे. अशात मतदारांच्या आभाराच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंत्री आशिष जयस्वाल यांचे हात बळकट केले आहे.

प्रचंड विरोध असतानाही शिवसेनेकडून रामटेकमध्ये आशिष जयस्वाल यांना संधी देण्यात आली. लोकसभेतील ही जागा शिवसेनेला राखता आली नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र रामटेकचा गड शिवसेनेनं काबीज केला. या मतदारसंघातील माजी खासदार कृपाल तुमाने यांचं ‘डिमोशन’ करून त्यांना आता विधान परिषदेचं आमदार करण्यात आलं आहे. तुमाने यांच्या रुपानं जे शिवसेनेला रामटेकमध्ये करणं शक्य झालं नाही, ते आता जयस्वाल यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हेतूनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच नागपूर जिल्ह्याचा दौरा केला.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघात शिंदेंनी सभा घेतल्या. निमित्त मतदारांच्या आभाराचं होतं. परंतु जयस्वाल यांचे हात त्यातून मजबूत झाल्याचं दिसत आहे. आशिष जयस्वाल यांना उमेदवारी देण्यावरून रामटेमध्ये बरेच रणकंद झालं. भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी तर अगदी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे झोपले आहेत का? अशीच भाषा वापरली. त्यामुळं रेड्डी यांच्यावर कारवाई देखील झाली. आता पुन्हा ते भाजपमध्ये घरवापसीसाठी ‘रेडी’ झाले आहेत. पण आता शिवसेनेकडून रामटेकमध्ये पकड मजबूत करण्याचं काम सुरू झालं आहे.

Charan Waghmare : सरकारी गाड्या फिरतात, पण वाघ मरतो

मोठा फायदा घेणार

लोक माने अगर न माने रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांना पकड मिळविता आली नाही. त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये बरीच नाराजी होती. त्यामुळं शिवसेनेनं लोकसभा निवडणूक ‘कॅन्डिडेट चेंज’चा पर्याय निवडला. पण काँग्रेसचे सुनील केदार यांनी आपलं वर्चस्व या भागात सिद्ध केलं. मतदारांनीही ‘नो पारवे ओन्ली श्याम बर्वे’ यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं शिवसेना आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम नको असं ठरवलं. आशिष जयस्वाल यांच्यासाठी तातडीनं ‘इनकमिंग’ सेवा सुरू केली. जयस्वाल आलेत. त्यांनी निवडणूक लढली. जयस्वाल जिंकलेही. नुसते जिंकलेच नाही तर मंत्रीही बनले. नुसते मंत्रीच बनले नाही तर सोन्याची खाण असलेल्या गडचिरोलीचे सहपालकमंत्रीही झालेत. गडचिरोलीसाठी सगळेच इतके आग्रही का असतात? हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. केवळ माओवाद संपविणं. गडचिरोली माओवाद मुक्त करणं हा एकमेव सामाजिक कार्याचा हेतू यामागं तर नक्कीच नाही.

निवडणूक जिंकल्यानंतर जयस्वाल आता पूर्व विदर्भातील शिवसेनेचे ‘हेवीवेट’ नेते झाले आहेत. पूर्व मध्ये एकनाथ शिंदे यांना आव्हानांचा ‘धनुष्य’ पेलणारा अर्जुनच मिळाल्यासारखं ते आहे. त्यामुळं सहाजिकत रामटेकमधील सभांच्या माध्यमातून शिंदे यांनी जयस्वाल विरोधकांसह महायुतीलाही योग्य तो संदेश दिला आहे. आगामी काळासाठी जयस्वालांवर आपला पूर्ण आशिष असेल हे शिंदे यांनी सगळ्यांना दाखवून दिलं आहे. जयस्वाल यांच्या माध्यमातून महायुती विशेषत: भाजपही रामटेकमध्ये अनेक हेतू साध्य करून घेणार आहे. खासदार श्यामकुमार बर्वे आणि एकूणच केदार गटाचं वर्चस्व मोडून काढणं हे देखील त्यापैकी एक राहणार आहे. एकनाथ शिंदे यांचा ‘आशिष’मिळाल्यानं रामटेकच्या आमदारसाहेबांचा ‘जय’ जयकार होणार, यात सवालच नाही.

Local Body Elections: शिंदे-भाजप-मनसे येणार एकत्र

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!