महाराष्ट्र

Akola Shiv Sena : पुतळा जाळला, प्रत्यंचा ताणली आता शरसंधान

Shrikant Shinde : नेतृत्वाच्या साखळीत पडली फट

Post View : 1

Author

अकोल्यातील शिवसेनेत अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला असून स्थानिक नेत्यांमध्ये उघडपणे बंडखोरीचा सूर उमटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लवकरच पुढाकार घेणार आहेत.

अकोल्यातील शिवसेनेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अखेर ऐरणीवर आला आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता थेट एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. पक्षात निर्माण झालेल्या अशांततेला शमवण्यासाठी श्रीकांत शिंदे पुढे सरसावले असून, लवकरच मुंबईत या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

माजी आमदार बाजोरिया यांच्या विरोधात स्थानिक शिवसैनिकांमध्ये कमालीचा संताप आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पुतळ्याला जाळून विरोध करण्यात आला. या पुतळा जाळण्याच्या घटनेनंतर पक्षश्रेष्ठींना दिलेल्या तक्रारींमध्ये स्पष्टपणे मागणी करण्यात आली आहे की बाजोरिया यांना संपर्कप्रमुख पदावरून हटवावे. त्यांच्या निर्णयशक्तीवर, पक्षाबाहेरून नेत्यांना पक्षात आणण्याच्या पद्धतीवर, तसेच शहरातील कोणत्याही स्थानिक नेत्याशी सल्लामसलत न करता निर्णय घेतल्यावर बोट ठेवले जात आहे.

Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक

रचना गोंधळली

या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे यांचा शिवसेनेत झालेला प्रवेशही वादाचे मूळ कारण बनला आहे. स्थानिकांना न सांगता दोघांनाही पक्षात घेऊन त्यांना थेट जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. ज्यामुळे संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. इतकेच नव्हे तर, अकोल्यात एकाच जिल्ह्यासाठी चार जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण संघटनात्मक रचना गोंधळलेली आहे.

या सगळ्या घटनांचा भडका आता थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे यावर तोडगा काढण्याची जबाबदारी आली असून, ते सध्या दौऱ्यावरून परतले आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यस्तता पाहता ही जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावरच येऊन पडली आहे. आता ते या अंतर्गत संघर्षाचे शस्त्रसंधीमध्ये रूपांतर करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nana Patole : शर्यत अजून संपलेली नाही

संकटग्रस्त समीकरणे 

उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांना पक्षात घेण्याच्या हालचालींमुळे महायुतीतील वातावरण अधिकच गडद झाले आहे. भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबत थेट जिल्हाध्यक्षाला धारेवर धरले असून, मिश्रा यांचा पक्षप्रवेश महापालिकेतील समीकरणांवर परिणाम करू शकतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. हे सर्व मुद्दे आता श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडले जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनेक नेत्यांची साक्ष ऐकून घेतली जाणार आहे. अकोल्यातील शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचे आव्हान श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर येऊन ठेपले आहे.

या संघर्षात कोणाचा ‘बाण’ खरा आणि कोणाचे ‘धनुष्य’ कमकुवत, हे ठरवण्याआधी एक यशस्वी समन्वयक म्हणून श्रीकांत शिंदे यांची राजकीय कुशलता आणि नेतृत्वक्षमता कसोटीला लागणार आहे. पक्षाच्या एकतेसाठी आणि संघटनेच्या दृढपणासाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरेल, यात शंका नाही. अकोल्यातील शिवसेनेच्या ‘राजकीय रणभूमीवर’ आता सगळ्यांच्या नजरा ठरल्या आहेत त्या ‘श्रीकांत शिंदेंच्या शरसंधानाकडे’.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!