महाराष्ट्र

एक कॉल अन् Sudhir Mungantiwar यांनी सोडवला प्रश्न

शेगाव, आळंदीप्रमाणे होणार विकास; दोन दिवसात विषय निकाली

Author

लोकहिताचं काम कोणतंही असो, ते करायचं असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठरविलं तर ते झालंच म्हणून समजा. असाच एक प्रश्न मुनगंटीवार यांनी दोन दिवसात निकाली लावला.

सुधीर मुनगंटीवार यांनी मनावर घेतलं अन् एखादं काम झालं नाही, असं होऊच शकत नाही. मुनगंटीवार दिलेला शब्द पूर्ण करतातच. त्यामुळंच ‘दिला शब्द केला पूर्ण’ असं त्यांच्या बाबतीत बोललं जातं. मुनगंटीवार यांनी असंच एक काम दोन दिवसात पूर्ण करून दाखवलं आहे. महाराष्ट्रात बोटावर मोजण्याएवढ्या नेत्यांमध्ये ही इच्छाशक्ती दिसून येते. त्यापैकी एक म्हणजे सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या कार्य तत्परतेची प्रचिती देणारा प्रसंग अलीकडेच सगळ्यांनी अनुभवला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तीर्थक्षेत्र विकासाचा प्रश्न त्यांनी केवळ एका कॉलवर सोडविला.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील मानाचं स्थान असलेल्या संप्रदायांपैकी एक. वारकरी संत वेदांत केसरी ब्र. भू. रंगनाथ महाराज (सोनपेठकर) यांचे सोनपेठ येथे जन्म व समाधीस्थळ आहे. सोनपेठचा तीर्थस्थळ विकास व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. शेगांव, आळंदीप्रमाणे हा विकास सर्वांना हवाहवासा वाटत होता. त्यासाठी रंगनाथ महाराजांचे भक्तगण गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नरत होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत त्यांनी उंबरठे झिजविले. परंतु कोणाच्याच हाती काहीच आले नाही. अखेर ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समितीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांना गाठले.

बँकेच्या भरतीत आरक्षणाची Sudhir Mungantiwar यांची मागणी

नंबर डायल केला अन्..

परभणी आणि चंद्रपूरमध्ये जवळपास 500 किलोमीटरचे अंतर आहे. पण चांगल्या कामासाठी मुनगंटीवार यांच्यासाठी भौगोलिक अंतर, पद वैगरे काहीच नाही. मुनगंटीवार हेच आपलं काम करू शकतात हा दृढ विश्वास समितीला होता. मुनगंटीवार यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव येताच त्यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना फोन केला. सोनपेठ तीर्थक्षेत्राचा प्रश्न जिल्हा नियोजन बैठकीत घेण्यास सांगितले. ‘तुम्ही विषय मंजूर करा. मी मुख्यमंत्र्यांशी आणि संबंधित विभागाशी बोलतो, असा विश्वास मुनगंटीवार यांनी बोर्डीकर यांना दिला.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सोनपेठ-पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी 29 जानेवारीच्या जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या बैठकीत हा विषय मांडला. त्यामुळं अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेला सोनपेठ तीर्थस्थळ विकासाचा प्रश्न निकाली लागला. त्यामुळं आमदार सुधीर मुनगंटीवार नावाची जादू काय आहे, हे सगळ्यांना पुन्हा कळलं. विशेष म्हणजे इकडे जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेत हा प्रश्न निकाली लागायचाच होता. इकडे मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सोपविण्यात आलं. ब्र. भू. रंगनाथ महाराज जन्मभूमी विकास समितीचे पदाधिकारी डॉ. बालाजी पारसेवार, ब्रह्मानंद सुधाकर चक्करवार, बालाजी वांकर, बालाजी पदमवार, नागेश शेटे, जीवन बसेट, आनंद डाके, गजानन गुंडावार, अनिल डुब्बेवार यांनी हे निवेदन दिलं.

Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी

क्षणाचाही विलंब नाही

हाती निवेदन येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यासंदर्भात निर्देश दिले. सोनपेठ तीर्थ स्थळाचा समावेश सरकारच्या पर्यटन स्थळात करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. इतकंच नव्हे तर शेगांव, आळंदी तीर्थ स्थळाप्रमाणे हा विकास करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळं 25 जानेवारीला समितीनं मुनंटीवार यांच्यापुढं हा विषय मांडला अन् 29 जानेवारीला काम मंजूरही झालं. त्यामुळं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा मुद्दा निकाली निघाला.

रंगनाथ महाराजांच्या भक्तांना आणि सोनपेठवासीयांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या एका कॉलने न्याय मिळाला. सोनपेठ तीर्थ स्थळाच्या विकासाचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे सोनपेठवासी आणि राज्यभरातील रंगनाथ महाराजांचे भक्त सध्या सोशल मीडियावर ‘वाघ हा वाघच असतो’ असा हॅशटॅग व्हायरल करीत आहेत. मुनगंटीवार यांच्याच पुढाकारानं अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथील विकासालाही चालना मिळाली. त्यामुळं जगभरातील लाखों गुरूदेव भक्त आजही मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेला मानतात. गुरूदेव भक्तांनंतर आता रंगनाथ महाराजांचे भक्तही सुधीर मुनगंटीवार हे ‘नाम ही काफी है’ असं म्हणत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!