महाराष्ट्र

लाडक्या बहिणींचे पैसे State Government तिजोरीत परत

मंत्री Aditi Tatkare यांचे खोटी माहिती देणाऱ्या महिलांना आव्हान 

Post View : 20

Author

लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला. यात काही खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे. खोटी माहिती देऊन लाभ घेतलेल्या महिलांकडून योजनेचे पैसे सरकार परत घेणार का ? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे.

राज्य शासनाची तिजोरी असते. सरकारी चलनच्या माध्यमातून ती रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत आणण्यासाठी अर्थ नियोजन विभागासोबत आमचा संपर्क सुरू आहे. या विभागाच्या माध्यमातून परतावा अधिकारी (Refund Head) तयार करून देणार. त्या माध्यमातून खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून ही रक्कम राज्याच्या तिजोरीत परत येणार, अस अदिती तटकरे म्हणाल्या आहेत. “असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, हे पैसे लोकोपयोगी, इतर योजनांसाठी, लोककल्याणकारी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. ज्याप्रकारे इतर योजनांमध्ये रुटीन रिफंड सिस्टीम (नियमित परतावा प्रणाली) असते, त्याचप्रकारे प्रणाली येथे देखील चालू होणार आहे. त्या लोकांनी खोट्या माहितीचा अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घेतला, त्यांचै पैसे राज्य सरकारच्या तिजोरीत परत येणार आहेत.

निवडणुकीपूर्वी Mahayuti ची आश्वासने मतदारांसाठी गाजर

पडताळणीतून सर्वेच समोर येईल

योजनेतील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत. तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करून योजनेचा लाभ घेत आहेत. त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत. त्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या की, “ आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत आम्ही परिवहन विभागासोबत काम करीत आहोत. ज्या महिलांनी उत्पन्नापलिकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, त्या महिला या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येणार आहेत. ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहू लागल्या आहेत, तसेच गेल्या पाच महिन्यांमध्ये ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे, त्या महिला देखील या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येणार आहेत, अस अदिती तटकरे म्हणाल्या.

“राज्य सरकार सर्वच अर्जांची पडताळणी करणार आहे. आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आवाहन करत आहोत की, अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपले अर्ज मागे घ्यावे, अस आव्हान अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना केले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!