जिल्ह्यात निर्माण झालेला एक प्रश्न आणि भंडाऱ्याच्या राजकारणात उठलेले मौनाचे वादळ. सत्तेच्या घरात एक विचार निर्माण झाला आणि प्रत्येकाच्या मनात उमटले की, भंडारा जिल्ह्याचा राजकारणात बाप कोण?
भंडाऱ्याच्या राजकीय अवकाशात सध्या एक वादळ शांतपणे धुरासारखे पसरत चाललंय. ते म्हणजे ‘जिल्ह्याच्या राजकारणात बाप कोण?’ हे शब्द कोणी उघडपणे उच्चारलेले नाहीत, पण तरीही ते हवेत आहेत. प्रत्येकाच्या ओठांवर नसेल, पण मनात मात्र तेच. ना ते एखाद्या पोस्टरवर आहेत, ना बॅनरवर. ना कोणी पत्रकार परिषदेत मांडलेत, ना निवडणूक सभांमध्ये. पण तरीही, चहाच्या टपरीवर बसलेला कार्यकर्ता, बंद दरवाज्याच्या बैठकीतले निर्णयकर्ते आणि मधल्या थरातील प्रामाणिक मतदार, सगळे जण हाच प्रश्न विचारताना आढळतात. कोण मोठा? कोण निर्णायक? आणि सर्वांत महत्त्वाचे, कोण शेवटी जबाबदारी स्वीकारणारा?
गेल्या काही काळात भंडाऱ्यातल्या सत्तेचे एक चित्र निर्माण झाले होते, एकत्र आलेले राजकीय कुटुंब. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, पण एकाच ध्येयासाठी चालणारी वाटचाल. या कुटुंबात एकसंधपणा दाखवण्याचे अनेक प्रयत्न झाले, एकमेकांना हात देऊन चालण्याचा काळ जपला गेला. पण कुटुंबातही कधीकधी भिंतींना बोल येतो आणि इथेही तसेच झाले. शांतपणे, पण थेट असा प्रश्न निर्माण झाला की, सगळ ढवळून निघालं. या राजकारणात जिल्ह्याचा बाप कोण? हा प्रश्न एकट्या घरापुरता राहिला नाही, तर तो संपूर्ण राजकीय वातावरणाला भिडला.
खरा प्रभाव दिसतो
या प्रश्नाचे सौंदर्य असे की, तो उपस्थित करणाऱ्याची वेगळी ओळख तयार होते. एखाद्याने कुठेही उगाच मोठेपणाचा आव न आणता, फक्त एक वाक्य सोडून दिले आणि सर्व बदलून गेले. हाच खरा प्रभाव. हे बोलणं गर्विष्ठ नसतं, पण आत्मविश्वासाने ओतप्रोत असते. म्हणूनच लोक म्हणतात की, बोललं खरेच… पण जे बोलले, ते कोणाला धक्का देऊन नाही, डोळे उघडून गेले. हे बोलणे कुणाला उद्देशून नव्हतं, पण सगळ्यांना लागू पडले.
भंडाऱ्याच्या राजकारणात अशा थरारक मोड्या अनेक वेळा पाहायला मिळाल्या आहेत. पण असा शांत विस्फोट क्वचितच पाहायला मिळतो. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट झाली की, जे बोलले गेले, ते काही चुकून नाही, तर अतिशय नेमके आणि योग्य वेळ साधून मांडलेले होते. कधी कधी शब्दांच्या आडून नव्हे, तर मौनाच्या कडूनही नेतृत्व उभं राहतं. हा प्रश्न विचारणे हे त्या नेतृत्वाचे एक रूप होते. असा मुद्दा मांडणे ही केवळ टीका नव्हती, तर एक वैचारिक झटका होता. राजकारणात सगळं गोंधळात चालू असताना, कोणी तरी थोडा स्थिरपणा देतो हळूच, पण निश्चितपणे.
उत्तर शोधण्यासाठी विचारांचे चक्र
बाप कोण? हा प्रश्न उपस्थित झाल्यावर शांतपणे प्रतिसाद येतातच. पण या शांततेमुळेच उलट अस्वस्थता वाढली. कारण जेव्हा सर्वजण शांत बसतात, तेव्हा लक्ष जातं त्यांच्यावर जे बोलले. मग, जो प्रश्न विचारला गेला, त्याचं उत्तर शोधण्यासाठी सगळे विचारांच्या चक्रात अडकतात. भंडाऱ्यात हेच सुरू आहे. प्रत्येकजण आता स्वतःलाच विचारतोय, आपण खरंच कुटुंबातील मोठे आहोत का? की फक्त चार भिंतींत बसलेले सदस्य? आणि हा आत्मचिंतनाचा क्षण घडवणं हे मोठेपणाचं एक संकेतच चिन्ह असतं.
म्हणूनच, संपूर्ण राज्यात एकत्र आलेल्या कुटुंबात जरी मतभेद दिसत नसले, तरी विचारांमध्ये निर्माण झालेला हलकासा तणाव जाणवतोच. याचवेळी, एक प्रमुख चेहरा शांतपणे, नेतृत्व स्वीकारणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतो. कुणालाही न झाकता, कुणालाही न उघडता. हीच खरी नेतृत्वाची साक्ष. म्हणूनच या सर्व घडामोडींमध्ये राज्याच्या कुटुंबप्रमुखाने केलेली पाठराखण इतकं मात्र सांगते की, भंडारा जिल्ह्याचा बाप कोण.