महाराष्ट्र

Nitin Gadkari : गडकरींच्या जीवनाला मिळाले नव’कांचन’ 

Women's Day : पत्नीच्या साथीनं यशस्वी सामाजिक, राजकीय प्रवास

Author

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या कांचन गडकरी यांनी नेहमीच पडद्यामागून मोठे योगदान दिले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीमागे त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. गडकरी यांनी पक्षात आणि केंद्र सरकारमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, मात्र त्यांच्या यशस्वी प्रवासात कांचन गडकरींच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचे कुटुंबीय राजकारणात नसले तरी निवडणुकीच्या काळात कांचन गडकरी यांनी मोठे योगदान दिले आहे.

भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कांचन गडकरी यांनी ‘संस्कार भारती’ संस्थेच्या अध्यक्षा म्हणून पदभार सांभाळले आहे. त्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय असून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवतात. त्यांनी तुळस आणि रांगोळी यांसारख्या भारतीय परंपरांच्या वैज्ञानिक आधारावरही सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या परंपरा केवळ अध्यात्माशी जोडलेल्या नसून त्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत.

Shiv Sena : विरोधकांवर सोडलेला ‘आइस’ थंड झाला?

समाजकारण महत्त्वाचे

गडकरी कुटुंबाने कधीही पक्षाकडे कोणत्याही नातेवाईकांसाठी तिकीट मागितले नाही. आज राजकारणात वंशपरंपरेने नेत्यांची मुले पुढे येताना दिसतात. मात्र कांचन गडकरी यांना हा मार्ग मान्य नाही. त्या स्पष्टपणे सांगतात की, कोणतीही व्यक्ती केवळ कुटुंबाच्या आधारावर मोठी होत नाही. त्याचे स्वतःचे गुण,  सामाजिक काम आणि लोकांमध्ये असलेली लोकप्रियता महत्त्वाची असते. कांचन गडकरी कधीही राजकारणात आल्या नाहीत. त्यांनी फक्त समाजकार्यालाच प्राधान्य दिले आहे.

मोलाचा पाठींबा 

नितीन गडकरी यांनी अनेक अडचणींवर मात करत आपली ओळख निर्माण केली. या संपूर्ण प्रवासात कांचन गडकरी यांनी त्यांना कायम पाठिंबा दिला. जेंव्हा नितीन गडकरी विविध राजकीय जबाबदाऱ्या पार पाडत होते. त्यावेळी कांचन गडकरी यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. पुरुषांच्या यशामध्ये त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. नितीन गडकरींच्या यशस्वी कारकिर्दीमागे कांचन गडकरी यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या संयमाने आणि समर्पणाने नितीन गडकरींना समाजसेवा आणि राजकारणात अधिक योगदान देता आले. महिला दिनाच्या निमित्ताने कांचन गडकरींसारख्या समर्थ महिलांच्या योगदानाचा सन्मान करणं आवश्यक आहे. त्यांच्या समर्पणामुळेच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!